Raj Kundra Fraud Case: 15 कोटी थेट शिल्पाच्या खात्यात, अभिनेत्री सापडली गोत्यात; आता होणार चौकशी

Last Updated:

Raj Kundra Fraud Case: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि तिचा पती राज कुंद्रा गेल्या काही काळापासून अडचणीत आहेत. 60 कोटी रुपयांच्या फसवणूक प्रकरणात दोघे अडकले आहेत.

 शिल्पा शेट्टीची चौकशी होणार
शिल्पा शेट्टीची चौकशी होणार
मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि तिचा पती राज कुंद्रा गेल्या काही काळापासून अडचणीत आहेत. 60 कोटी रुपयांच्या फसवणूक प्रकरणात दोघे अडकले आहेत. अशातच मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने (EOW) 60 कोटी रुपयांच्या कथित फसवणुकीच्या तपासात मोठा खुलासा केला आहे. ज्यामुळे आता शिल्पाचीही चौकशी होईल.
मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने (EOW) शिल्पा शेट्टी आणि तिचा पती राज कुंद्रा यांच्या 60 कोटी रुपयांच्या कथित फसवणुकीच्या प्रकरणात एक मोठा खुलासा केला आहे. ईओडब्ल्यूच्या म्हणण्यानुसार, राज कुंद्राने फसवणुकीच्या या 60 कोटी रुपयांमधून 15 कोटी रुपये थेट शिल्पा शेट्टीच्या कंपनीच्या बँक खात्यात ट्रान्सफर केले आहेत. त्यामुळे आता या प्रकरणात शिल्पा शेट्टीला लवकरच चौकशीसाठी बोलावले जाण्याची शक्यता आहे.
advertisement
ईओडब्ल्यूच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, त्यांना ही मोठी रक्कम का ट्रान्सफर केली गेली, याचा उद्देश जाणून घ्यायचा आहे. अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, जाहिरात किंवा व्यावसायिक कामांसाठी एवढी मोठी रक्कम ट्रान्सफर करणे अनाकलनीय आहे. त्यामुळे ही रक्कम कोणत्या आधारावर शिल्पाच्या कंपनीला दिली गेली, याबद्दल चौकशी केली जाईल. शिल्पा शेट्टीच्या कंपनीने यासाठी कोणत्या प्रकारचे बिल दिले होते, याचीही तपासणी केली जाणार आहे.
advertisement
60 कोटी फसवणूक प्रकरण काय आहे?
एका बिल्डरने राज कुंद्रा आणि शिल्पा शेट्टी यांच्यावर 60 कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप केला आहे. बिल्डरचा दावा आहे की, शिल्पा आणि राज यांनी एका कंपनीच्या माध्यमातून त्याच्याकडून मोठी रक्कम घेतली, पण नंतर कंपनीच्या नावावर कोणतीही मालमत्ता हस्तांतरित केली नाही. यामुळे आता शिल्पा शेट्टीची या प्रकरणात भूमिका काय होती, याचा तपास केला जाईल. ईओडब्ल्यूला खात्री आहे की, शिल्पाच्या चौकशीतून अनेक नवीन गोष्टी समोर येतील.
मराठी बातम्या/मनोरंजन/
Raj Kundra Fraud Case: 15 कोटी थेट शिल्पाच्या खात्यात, अभिनेत्री सापडली गोत्यात; आता होणार चौकशी
Next Article
advertisement
OTT Movie: धाकटीशी लग्न, मोठीसोबत सुहागरात, 1 तास 19 मिनिटांच्या सिनेमाने ओटीटीवर उडवलीय खळबळ
धाकटीशी लग्न, मोठीसोबत सुहागरात, 1 तास 19 मिनिटांच्या सिनेमाने OTTवर उडवलीय खळबळ
    View All
    advertisement