advertisement

Vaibhav Sooryavanshi : वर्ल्ड कपचा सामनावीर अन् मालिकावीर, वैभवने स्वतः कमावलेले 2 पुरस्कार कुणाला दिले?

Last Updated:

अंडर 19 वर्ल्ड कपमध्ये टीम इंडिया सहाव्यांदा वर्ल्ड चॅम्पियन झाली आहे. फायनलमध्ये टीम इंडियाने इंग्लंडचा 100 रननी पराभव केला आहे.

वर्ल्ड कपचा सामनावीर अन् मालिकावीर, वैभवने स्वतः कमावलेले 2 पुरस्कार कुणाला दिले?
वर्ल्ड कपचा सामनावीर अन् मालिकावीर, वैभवने स्वतः कमावलेले 2 पुरस्कार कुणाला दिले?
मुंबई : अंडर 19 वर्ल्ड कपमध्ये टीम इंडिया सहाव्यांदा वर्ल्ड चॅम्पियन झाली आहे. फायनलमध्ये टीम इंडियाने इंग्लंडचा 100 रननी पराभव केला आहे. भारताने दिलेल्या 412 रनच्या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडचा 311 रनवर ऑल आऊट झाला. वैभव सूर्यवंशी हा भारताच्या विजयाचा शिल्पकार ठरला. वैभवने फायनलमध्ये 80 बॉलमध्ये 15 फोर आणि 15 सिक्सच्या मदतीने 175 रनची वादळी खेळी केली. या कामगिरीबद्दल वैभवला प्लेअर ऑफ द मॅच देऊन गौरवण्यात आलं.
अंडर 19 वर्ल्ड कपच्या 7 सामन्यांमध्ये वैभवने 62.71 च्या सरासरीने आणि 169.49 च्या स्ट्राईक रेटने 439 रन केले, यामध्ये 1 शतक आणि 3 अर्धशतकांचा समावेश होता. अंडर 19 वर्ल्ड कपमध्ये वैभवने 41 फोर आणि 30 सिक्सही मारल्या, या कामगिरीबद्दल वैभवला प्लेअर ऑफ द टुर्नामेंटचा पुरस्कारही देण्यात आला.

काय म्हणाला वैभव?

advertisement
प्लेअर ऑफ द मॅच आणि प्लेअर ऑफ द टुर्नामेंटचा पुरस्कार मिळाल्यानंतर वैभवने आपल्याला खूप छान वाटत असल्याची प्रतिक्रिया दिली. 'सपोर्ट स्टाफने घेतलेली मेहनत, आम्ही केलेले प्रयत्न, आशिया कप आणि त्याआधीची सीरिज, या सर्व गोष्टींमुळे आम्ही इथपर्यंत आलो. मी हा पुरस्कार आमच्या संपूर्ण सपोर्ट स्टाफला समर्पित करू इच्छितो', असं वैभव म्हणाला.
advertisement
'जास्त दबाव घ्यायचा नाही, हे आमचे मुख्य ध्येय होते. आम्ही स्वतःवर विश्वास ठेवला, स्पर्धेच्या सुरूवातीपासूनच आम्ही प्रक्रियेवर विश्वास ठेवला. मागच्या 8-9 महिन्यांपासून सपोर्ट स्टाफ आणि टीम एकत्र काम करत आहे. आम्ही आज जिथे आहोत, तिथे पोहोचण्यात तयारीने मोठी भूमिका बजावली आहे. माझ्या स्किलवर मला विश्वास आहे, मला माहिती आहे की मी मोठ्या सामन्यांमध्ये आणि दबावाखालीही खेळू शकतो. माझा स्वतःवर विश्वास होता,' असं वैभव सूर्यवंशी फायनलमधल्या विजयानंतर म्हणाला आहे.
view comments
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
Vaibhav Sooryavanshi : वर्ल्ड कपचा सामनावीर अन् मालिकावीर, वैभवने स्वतः कमावलेले 2 पुरस्कार कुणाला दिले?
Next Article
advertisement
Ola, Uber, Rapidoचा उद्या संप; बाईक टॅक्सीपासून कॅबपर्यंत सगळं ठप्प! ‘ऑल इंडिया ब्रेकडाऊन’ आंदोलन,सरकारला दिला अल्टिमेटम
Ola, Uber, Rapidoचा उद्या संप; बाईक टॅक्सीपासून कॅबपर्यंत सगळं ठप्प!
  • उद्या देशव्यापी संप

  • ओला, उबर, रॅपिडोचा 'ऑल इंडिया ब्रेकडाऊन'

  • ओला-उबर चालकांचा गडकरींना 'अल्टिमेटम'

View All
advertisement