Cricket : वर्ल्ड कपपूर्वी मराठमोळ्या क्रिकेटरकडून निवृत्तीची घोषणा, धोनी स्टाईलने घेतली Exit
- Published by:Pooja Pawar
Last Updated:
दिनेश कार्तिकनंतर आता टी 20 वर्ल्ड कपपूर्वी टीम इंडियाच्या अजून एका क्रिकेटरने निवृत्तीची घोषणा केली आहे.
मुंबई : काहीच दिवसांपूर्वी टीम इंडियाचा स्टार फलंदाज आणि विकेटकिपर दिनेश कार्तिकने क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली होती. तर आता टीम इंडियाचा मराठमोळा क्रिकेटर केदार जाधव याने सुद्धा क्रिकेटच्या सर्व फॉरमॅटमधून निवृत्ती घेत असल्याचे जाहीर केले आहे. केदारने सोशल मीडियावर दोन ओळींची पोस्ट करून निवृत्तीची घोषणा केली.
बॅटिंग ऑलराऊंडर क्रिकेटर केदार जाधवला मागील काही वर्षांपासून टीम इंडियात खेळण्याची संधी मिळाली नव्हती. शेवटी 2020 मध्ये न्यूझीलंड विरुद्ध खेळवण्यात आलेला सामन्यात त्याचा टीम इंडियात समावेश करण्यात आलेला होता. केदार जाधव हा 2019 च्या वर्ल्ड कपमध्ये भारतीय संघाचा भाग राहिला होता.
केदार जाधव काही वर्षांपासून कॉमेंटेटर म्हणून काम करत आहे. गेल्या दोन वर्षांपासून केदार जाधव आयपीएलची मराठी भाषेत कॉमेंट्री करत आहे. आयपीएल 2023 मध्ये केदार जाधवला रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या टीमने एका खेळाडूची रिप्लेसमेंट म्हणून केदारला आपल्या संघात घेतले होते. माजी क्रिकेटर केदार जाधवने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करून लिहिले, "माझ्या संपूर्ण कारकिर्दीत तुम्ही मला दिलेल्या प्रेमाबद्दल आणि पाठिंब्याबद्दल तुमचा आभारी आहे. 1500 तासांपासून मला सर्व प्रकारच्या क्रिकेट फॉरमॅटमधून निवृत्त समजावे ". केदारने एक व्हीडिओ पोस्ट केलाय. यात त्याचे टी 20, वनडे आणि आयपीएलमधील फोटो पाहायला मिळत आहेत. तर ‘जिंदगी के सफर मे’, हे गाणं व्हीडिओच्या बॅकग्राउंडला आहे. एम एस धोनीसुद्धा 2020 मध्ये अशाच प्रकारे व्हिडीओ पोस्ट करून निवृत्ती जाहीर केली होती.
advertisement
advertisement
Thank you all For your love and support throughout my Career from 1500 hrs
Consider me as retired from all forms of cricket— IamKedar (@JadhavKedar) June 3, 2024
केदार जाधवने टीम इंडियाकडून वनडे क्रिकेटमध्ये एकूण 73 सामने खेळले आहेत. यात त्याने 1389 धावा केल्या आणि 27 विकेट्स घेतले आहेत. केदारने टी 20 क्रिकेटमध्ये टीम इंडियाकडून 9 सामने खेळले आणि 1208 धावा केल्या आहेत. तर आयपीएलमध्ये त्याने 95 सामने खेळले असून यात 1208 धावा केल्या आहेत.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
June 03, 2024 4:24 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
Cricket : वर्ल्ड कपपूर्वी मराठमोळ्या क्रिकेटरकडून निवृत्तीची घोषणा, धोनी स्टाईलने घेतली Exit