India Win Asia Cup 2025: चॅम्पियन टीम इंडियाचा मोठा निर्णय, पाकिस्तानी मंत्र्यांच्या हस्ते ट्रॉफी नाकारली, पुरस्कार सोहळ्यात हायहोल्टेज ड्रामा

Last Updated:

सामना जिंकल्यानंतर मैदानात पुन्हा हायहोल्टेज ड्रामा पाहण्यास मिळाला. भारतीय संघाने पाकिस्तानी मंत्र्यांच्या हस्ते आशिया कपची ट्रॉफी घेण्यास नकार दिला

News18
News18
दुबई: आशिया कप २०२५ ची सांगता भारताच्या विजयाने झाली. पाकिस्तानला लोळवत भारताने आम्हीच आशियाचे किंग असल्याचं दाखवून दिलं. पण, सामना जिंकल्यानंतर मैदानात पुन्हा हायहोल्टेज ड्रामा पाहण्यास मिळाला. भारतीय संघाने पाकिस्तानी मंत्र्यांच्या हस्ते आशिया कपची ट्रॉफी घेण्यास नकार दिला आहे. त्यामुळे पुरस्कार सोहळा उशिरा पार पडला.
जम्मू-काश्मिरमध्ये पहलगाम हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये तणाव निर्माण झाला होता. भारताने ऑपरेशन सिंदूर राबवून पाकिस्तानला अद्दल घडवली. पण रणभूमीनंतर आशिया कप 2025 मध्ये पाकिस्तानी टीम भारताला भिडली. पण भारताने पाकिस्तानवर ५ गडी राखून रोमहर्षक विजय मिळवला. मात्र, टीम इंडियाला ट्रॉफी देण्यासाठी पाकिस्तान सरकारचे मंत्री आणि एसीसी प्रमुख मोहसीन नकवी आले होते
advertisement
पण भारतीय टीमने पाकिस्तानी मंत्र्यांच्या हस्ते ट्रॉफी घेण्यास नकार दिला. त्यामुळे प्रेझेंटेशन सोहळा उशिराने सुरू झाला. पीटीआयनेही वृत्त दिलं आहे की, भारतीय टीमने पाकिस्तानी मंत्र्यांच्या हस्ते पुरस्कार घेण्यास नकार दिला आहे. त्यामुळे पुरस्कार सोहळ्यात मोठा पेच निर्माण झाला. भारतीय टीम ही ड्रेसिंग रुमच्या बाहेर आलीच नाही. त्यामुळे आयोजनांना अखेर माघार घ्यावी लागली.
advertisement
शेवटी एमिरेट्स क्रिकेट बोर्डाचे उपाध्यक्ष खालिद अल झारुनी यांना भारतीय टीमला ट्रॉफी देण्यास आमंत्रित करण्यात आलं. त्यानंतर भारतीय संघाने यासाठी होकार दिला.
पंतप्रधान मोदी यांचं हटके ट्वीट
आशिया कप २०२५ मध्ये भारत आणि पाकिस्तानमध्ये हायहोल्टेज अंतिम सामना झाला. रोमहर्षक सामन्यात भारताने ५ गडी राखून  विजय मिळवला. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी टीम इंडियाच्या विजयावर खास ट्वीट केलं. हॅशटॅक ऑपरेशन सिंदूर हे मैदानात सुद्धा सुरूच आहे. मैदानात सुद्धा तेच उत्तर मिळालं, भारताचा विजय झाला, असं म्हणत पंतप्रधान मोदींनी भारतीय टीमचं अभिनंदन केलं.
advertisement
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हटके शुभेच्छा दिल्यानंतर सोशल मीडियावर एकच धुरळा उडाला. पाकिस्तानच्या टीमला आता ट्रोल केलं जात आहे. पाकिस्तानच्या टीमला अतिआत्मविश्वास चांगलाच नडला. भारतासोबत एकही सामना जिंकता आला नाही. त्यामुळे पाकिस्तानमध्ये आता टीव्ही फुटणार हे नक्की आहे.
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
India Win Asia Cup 2025: चॅम्पियन टीम इंडियाचा मोठा निर्णय, पाकिस्तानी मंत्र्यांच्या हस्ते ट्रॉफी नाकारली, पुरस्कार सोहळ्यात हायहोल्टेज ड्रामा
Next Article
advertisement
Guess Who: 15 व्या वर्षी घरातून पळाली, नशेच्या आहारी गेली; आज कोट्यवधींची मालकीण आहे ही अभिनेत्री
15व्या वर्षी घरातून पळाली, नशेच्या आहारी गेली; आज अभिनेत्री कोट्यवधींची मालकीण
    View All
    advertisement