IND vs PAK : पाकिस्तानचा कॅप्टन निघाला अतीशहाणा, 15व्या ओव्हरमध्ये फिरली अख्खी मॅच, कुणाच्याच लक्षात आलं नाही!
- Published by:Shreyas Deshpande
Last Updated:
आशिया कपच्या फायनलमध्ये टीम इंडियाचा रोमांचक विजय झाला आहे. याचसोबत भारताने पुन्हा एकदा पाकिस्तानला पराभवाची धूळ चारली आहे.
दुबई : आशिया कपच्या फायनलमध्ये टीम इंडियाचा रोमांचक विजय झाला आहे. याचसोबत भारताने पुन्हा एकदा पाकिस्तानला पराभवाची धूळ चारली आहे. पाकिस्तानने दिलेल्या 147 रनच्या आव्हानाचा पाठलाग भारताने 19.4 ओव्हरमध्ये 5 विकेट गमावून पार केला. तिलक वर्मा भारताच्या या ऐतिहासिक विजयाचा शिल्पकार ठरला. तिलक वर्माने 53 बॉलमध्ये नाबाद 69 रनची खेळी केली. पाकिस्तानच्या या आव्हानाचा पाठलाग करताना भारताने पहिल्या 3 विकेट 20 रनवरच गमावल्या होत्या. पण तिलक वर्माने पहिले संजू सॅमसन आणि मग शिवम दुबेच्या मदतीने भारताला विजयापर्यंत पोहोचवलं.
शिवम दुबेने 22 बॉलमध्ये 33 रनची खेळी केली तर संजू सॅमसनने 21 बॉलमध्ये 24 रन केले. सामन्याच्या 14व्या ओव्हरपर्यंत पाकिस्तान या सामन्यात विजय मिळवू शकते, असं वाटत होतं. कारण भारताला विजयासाठी शेवटच्या 6 ओव्हरमध्ये 64 रनची गरज होती, पण तेव्हाच पाकिस्तानचा कर्णधार सलमान आघाने मोठी चूक केली आणि सामना टीम इंडियाच्या बाजूने झुकला.
advertisement
15 व्या ओव्हरमध्ये फिरला सामना
पाकिस्तानच्या स्पिनरनी टीम इंडियाच्या बॅटिंगला रोखून धरलं होतं. 14व्या ओव्हरमध्ये सॅम अयुबने 5 रन दिल्या होत्या. यानंतर पुढची ओव्हर अबरार अहमद टाकेल असं वाटत होतं, पण तरीही सलमान आघाने हारिस राऊफच्या हातात बॉल दिला, या ओव्हरला टीम इंडियाने तब्बल 17 रन काढल्या, ज्यामध्ये 2 फोर आणि एका सिक्सचा समावेश होता. अबरार अहमदचा बॉलिंग एन्ड बदलण्याच्या या निर्णयावर कॉमेंटेटर सायमन डूल यांनीही टीका केली. अबरार अहमदचा बॉलिंग एन्ड बदलून पाकिस्तानने मोठी चूक केल्याचं डूल म्हणाले. यानंतर अबरार पुढच्या ओव्हरला एन्ड बदलून आला आणि या ओव्हरलाही 11 रन आले.
advertisement
हारिस राऊफच्या या ओव्हरमुळे टीम इंडियावरचा दबाव कमी झाला. यानंतर हारिस राऊफने मॅचची 18वी ओव्हरही टाकली, ज्यात त्याने 13 रन दिल्या. हारिस राऊफने या सामन्यात 3.4 ओव्हरमध्ये तब्बल 50 रन दिले, यात त्याला एकही विकेट मिळाली नाही. यंदाच्या आशिया कपमधला टीम इंडियाचा पाकिस्तानविरुद्धचा तीन सामन्यांमधला हा तिसरा विजय आहे. तसंच यंदाच्या आशिया कपमध्ये टीम इंडियाने एकही मॅच गमावली नाही. आशिया कपच्या 7 सामन्यांमध्ये टीम इंडियाने 7 विजय मिळवले.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
September 29, 2025 12:34 AM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
IND vs PAK : पाकिस्तानचा कॅप्टन निघाला अतीशहाणा, 15व्या ओव्हरमध्ये फिरली अख्खी मॅच, कुणाच्याच लक्षात आलं नाही!