IPL 2024: शाहरुख आणि केकेआरने BCCI ला चिडवलं? ट्रॉफी जिंकल्यावर केलं असं सेलिब्रेशन
- Published by:Pooja Pawar
Last Updated:
फायनलमध्ये मिळवलेल्या मोठ्या विजयानंतर केकेआरचा मालक अभिनेता शाहरुख खान याने टीम सोबत अनोखं सेलिब्रेशन केलं. या सेलिब्रेशन वेळी दिलेल्या एका पोझमुळे त्यांनी बीसीसीआयला चिडवलं असल्याचं बोललं जात आहे.
मुंबई : आयपीएल 2024 मध्ये रविवारी सनरायजर्स हैदराबाद विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात फायनलचा सामना खेळवण्यात आला. या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सने हैदराबादचा दारुण पराभव करून ट्रॉफीवर नाव कोरले. केकेआरची आयपीएलच्या इतिहासातील ही तिसरी ट्रॉफी ठरली. फायनलमध्ये मिळवलेल्या मोठ्या विजयानंतर केकेआरचा मालक अभिनेता शाहरुख खान याने टीम सोबत अनोखं सेलिब्रेशन केलं. या सेलिब्रेशन वेळी दिलेल्या एका पोझमुळे त्यांनी बीसीसीआयला चिडवलं असल्याचं बोललं जात आहे.
चेन्नईच्या एम चिदंबरम स्टेडियमवर सनरायजर्स हैदराबाद विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात सामना पार पडला. या सामन्यात हैदराबादने प्रथम फलंदाजी करून20 ओव्हरमध्ये 10 विकेट्स गमावून केवळ 113 धावा केल्या ज्यामुळे केकेआरला विजयासाठी 114 धावांचं सोपं आव्हान मिळालं होत. कोलकाता नाईट रायडर्सने हे आव्हान 8 विकेट्स आणि तब्बल 10 ओव्हर्स राखून पूर्ण केलं. ज्यामुळे कोलकाता नाईट रायडर्सचा विजय झाला. कोलकाता नाईट रायडर्स ही टीम प्लेऑफमध्ये क्वालिफाय करणारी सुद्धा पहिली टीम होती.
advertisement
कोलकाता नाईट रायडर्सने फायनल सामन्यात विजय मिळवल्यावर टीमचा मालक शाहरुख खान याने मैदानात टीम सह तुफान सेलिब्रेशन केले. श्रेयस अय्यर याने संपूर्ण टीम सोबत मुख्य मंचावर येऊन ट्रॉफी उंचावली. मग ट्रॉफीसह केकेआरचा मालक शाहरुख खान याने टीम सह सेलिब्रेशन केले. यावेळी शाहरुख खान याने ट्रॉफी सोबत फोटो काढत असताना टीम सोबत फ्लायिंग किस देत पोझ दिली.
advertisement
Shah Rukh Khan told everyone to give a flying kiss celebration. pic.twitter.com/qW1yOW2iDc
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) May 26, 2024
KKR 3rd time labelled in gold on the IPL trophy. pic.twitter.com/msq1fiSxGm
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) May 27, 2024
advertisement
केकेआरचा स्टार गोलंदाज हर्षित राणा याने आयपीएल 2024 मध्ये सनरायजर्स हैदराबाद विरुद्ध झालेल्या लीग स्टेज सामन्यात मयांक अग्रवाल याची विकेट घेतल्यावर त्याला फ्लायिंग किस दिली होती. ज्यामुळे बीसीसीआयने नियमाचे उल्लंघन केल्या प्रकरणात हर्षित राणा याच्या मॅच फी वर दंड लावला. त्यानंतर पुढील अशाच एका लीग स्टेज सामन्यातही मैदानात अतिउत्साही सेलिब्रेशन केल्याने पुन्हा बीसीसीआयने त्याच्या मॅच फीवर 100 टक्के दंड लावला आणि एका सामन्यासाठी त्याच्यावर बंदी आणली. शाहरुख आणि केकेआरच्या टीमने हीच गोष्ट लक्षात ठेऊन ट्रॉफी जिंकल्यावर फ्लायिंग किस देत सेलिब्रेशन केल्याचं दिसून येत आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
May 27, 2024 5:23 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
IPL 2024: शाहरुख आणि केकेआरने BCCI ला चिडवलं? ट्रॉफी जिंकल्यावर केलं असं सेलिब्रेशन