LSG vs SRH : 'झिंज्या उपटून मारीन...', अभिषेक अन् दिग्वेश राठी यांच्या वादात राजीव शुक्लांची मध्यस्थी, मॅच संपल्यावर काय झालं?
- Published by:Saurabh Talekar
Last Updated:
Abhishek Sharma Digvesh Rathi Fight : दिग्वेश राठीने अभिषेकला बाद केल्यानंतर त्याच्या ट्रेडमार्क 'नोटबुक सेलिब्रेशन'ने आनंद व्यक्त केला. राठीचे हे सेलिब्रेशन अभिषेकला आवडलं नाही.
LSG vs SRH, IPL 2025 : लखनऊच्या एकाना स्टेडियमवर झालेल्या लखनऊ सुपर जायंट्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यातील सामन्यात अभिषेक शर्मा आणि दिग्वेश राठी (Abhishek Sharma Digvesh Rathi Fight) यांच्यात जोरदार वाद झाला होता. दिग्वेश राठी याने जेव्हा अभिषेक शर्माला याला आऊट केल्यानंतर अतरंगी दिग्वेशने अभिषेक शर्माला माघारी जाण्याचा इशारा केला. त्यामुळे अभिषेक चांगलाच संतापला होता. अभिषेकने 20 चेंडूत 59 धावांची धडाकेबाज खेळी केली होती.
ट्रेडमार्क 'नोटबुक सेलिब्रेशन'
दिग्वेश राठीने अभिषेकला बाद केल्यानंतर त्याच्या ट्रेडमार्क 'नोटबुक सेलिब्रेशन'ने आनंद व्यक्त केला. राठीचे हे सेलिब्रेशन अभिषेकला आवडले नाही आणि त्यामुळे दोघांमध्ये बाचाबाची झाली. दोघेही एकमेकांच्या अंगावर धावून गेले. मैदानातील पंचांनी आणि इतर खेळाडूंनी मध्यस्थी करत दोघांना शांत केलं. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
advertisement
Heated Kalesh b/w Abhishek Sharma and Digvesh Rathi:#IPL2025 #SRHvsLSG pic.twitter.com/7lvD5paBCR
— TajKeProperties (@Mawt777) May 20, 2025
राजीव शुक्लांनी मिटवला वाद
दिग्वेश राठी आणि अभिषेक शर्मा यांच्यातील वाद अखेर बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी मिटवला. मॅच झाल्यानंतर राजीव शुक्ला मैदानात आले. तेव्हा त्यांनी दोन्ही खेळाडूंना बोलावून घेतलं. त्यावेळी तिघांमध्ये संभाषण झालं. यावेळी तिघंही हसताना दिसून आले. त्याचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
advertisement
Rajiv Shukla meditating for Cease Fire pic.twitter.com/dsBtn0KVcB
— Saebeee… (@think___strong) May 19, 2025
पुन्हा दंडात्मक कारवाई?
दरम्यान, याआधी नोटबुक स्टाईल सेलिब्रेशनमुळे दिग्वेशला बीसीसीआयकडून दोनदा दंड सहन करावा लागला आहे. तसेच सनरायझर्स हैदराबादने केवळ सामना जिंकला नाही तर लखनऊ सुपरजायंट्सचे प्लेऑफमध्ये पोहोचण्याचे स्वप्नही भंगलंय.
Location :
Lucknow,Uttar Pradesh
First Published :
May 20, 2025 8:48 AM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
LSG vs SRH : 'झिंज्या उपटून मारीन...', अभिषेक अन् दिग्वेश राठी यांच्या वादात राजीव शुक्लांची मध्यस्थी, मॅच संपल्यावर काय झालं?