LSG vs SRH : दिग्वेशने खोड काढली मग अभिषेक शर्मावर दंडात्मक कारवाई का? BCCI ने सांगितलं कारण!
- Published by:Saurabh Talekar
Last Updated:
BCCI Action On Abhishek Sharma : दिग्वेश राठी आणि अभिषेक शर्मा यांच्यातील वादानंतर (LSG vs SRH) आता बीसीसीआयने धडक कारवाई केली आहे.
Abhishek Sharma fined In LSG vs SRH Match : चल निघ...असा इशारा करत सनरायझर्स हैदराबादचा स्टार खेळाडू अभिषेक शर्मा याला लखनऊच्या दिग्वेश राठी याने डिवचलं होतं. त्यानंतर लाईव्ह सामन्यात मोठा वाद पेटला. अभिषेक शर्मा आणि दिग्वेश राठी यांच्यात बाचाबाची झाली. दोन्ही खेळाडू भिडले. दिग्वेश राठी तावातावात अभिषेकच्या अंगावर धावून आला होता. त्यामुळे दिग्वेश राठीवर मोठ्या प्रमाणात टीका झाली. अशातच आता अभिषेक शर्मावर देखील कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे.
अभिषेक शर्मावर कारवाई का?
सनरायझर्स हैदराबादचा अष्टपैलू खेळाडू अभिषेक शर्मा यालाही आयपीएल आचारसंहितेचे उल्लंघन केल्याबद्दल त्याच्या मानधनाच्या 25 टक्के दंड ठोठावण्यात आला आहे. या हंगामातील हे त्याचे पहिले लेवल 1 चे उल्लंघन होते आणि त्यामुळे त्याला एक डिमेरिट गुण मिळाला आहे. लेवल 1 च्या उल्लंघनासाठी सामनाधिकाऱ्यांचा निर्णय अंतिम आणि बंधनकारक असतो.
advertisement
दिग्वेश सिंगचं निलंबन
अभिषेक शर्मा याने दिग्वेश राठी याला प्रत्युत्तर दिल्याने सामनाधिकाऱ्यांनी अभिषेक शर्मावर देखील कारवाई केली आहे. मात्र, सर्वात मोठी चूक दिग्वेशची असल्याने त्याच्यावर मोठी कारवाई करण्यात आली आहे. दिग्वेश सिंग याला आयपीएल आचारसंहितेचे उल्लंघन केल्याप्रकरणी त्याच्या मानधनाच्या 50 टक्के दंड ठोठावण्यात आला आहे. तसेच त्याच्यावर एका सामन्यांची बंदी देखील घालण्यात आली आहे.
advertisement
- Digvesh Rathi suspended for Next Match.
- Digvesh Rathi now has 5 Demerits Points.
- Digvesh Rathi Fined 50% of match fees.
- Abhishek Sharma Fined 25% of match fees. pic.twitter.com/P0bSCiUBbq
— Cricket With Manmohan (@GarhManmohan) May 20, 2025
advertisement
नेमकं काय घडलं होतं?
दिग्वेश राठीने अभिषेकला बाद केल्यानंतर त्याच्या ट्रेडमार्क 'नोटबुक सेलिब्रेशन'ने आनंद व्यक्त केला. राठीचे हे सेलिब्रेशन अभिषेकला आवडले नाही आणि त्यामुळे दोघांमध्ये बाचाबाची झाली. दोघेही एकमेकांच्या अंगावर धावून गेले. मैदानातील पंचांनी आणि इतर खेळाडूंनी मध्यस्थी करत दोघांना शांत केलं. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
Location :
Lucknow,Uttar Pradesh
First Published :
May 20, 2025 11:49 AM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
LSG vs SRH : दिग्वेशने खोड काढली मग अभिषेक शर्मावर दंडात्मक कारवाई का? BCCI ने सांगितलं कारण!