IPL 2025 : 230 बॉल बघितलेत, पण या 21 बॉलमुळे मुंबई प्ले-ऑफमध्ये, कुणाच्याच लक्षात नाही आलं!

Last Updated:

आयपीएल 2025 मध्ये मुंबई इंडियन्सने प्ले-ऑफमध्ये धडक मारली आहे. दिल्ली कॅपिटल्सचा 59 रननी पराभव करून मुंबई प्ले-ऑफला पोहोचणारी चौथी टीम ठरली आहे.

230 बॉल बघितलेत, पण या 21 बॉलमुळे मुंबई प्ले-ऑफमध्ये, कुणाच्याच लक्षात नाही आलं!
230 बॉल बघितलेत, पण या 21 बॉलमुळे मुंबई प्ले-ऑफमध्ये, कुणाच्याच लक्षात नाही आलं!
मुंबई : आयपीएल 2025 मध्ये मुंबई इंडियन्सने प्ले-ऑफमध्ये धडक मारली आहे. दिल्ली कॅपिटल्सचा 59 रननी पराभव करून मुंबई प्ले-ऑफला पोहोचणारी चौथी टीम ठरली आहे. याआधी गुजरात, आरसीबी आणि पंजाब किंग्स या टीम प्ले-ऑफला पोहोचल्या आहेत. मुंबईविरुद्धच्या सामन्यात दिल्लीचा कर्णधार फाफ डुप्लेसिसने टॉस जिंकून पहिले बॉलिंगचा निर्णय घेतला, यानंतर दिल्लीने टिच्चून बॉलिंग करत मुंबईला रोखलं, पण 21 बॉलमध्येच सामना मुंबईच्या बाजूने फिरला.
17 व्या ओव्हरच्या तिसऱ्या बॉलला मुंबईने हार्दिक पांड्याच्या रुपात पाचवी विकेट गमावली. हार्दिक पांड्याची विकेट गेली तेव्हा मुंबईचा स्कोअर 123 रन होता, पण पुढच्या 21 बॉलमध्ये सूर्यकुमार यादव आणि नमन धीर यांनी वादळी खेळी केली. या 21 बॉलमध्ये सूर्या आणि नमन धीर यांनी 57 रन काढल्या आणि मुंबईचा स्कोअर 180 पर्यंत पोहोचवला, या पार्टनरशीपमुळे मुंबईचा दणदणीत विजय झाला.
advertisement
सूर्यकुमार यादवने 43 बॉलमध्ये नाबाद 73 तर नमन धीरने 8 बॉलमध्ये नाबाद 24 रन केले. याशिवाय तिलक वर्माने 27, रिकलटनने 25 आणि विक जॅक्सने 21 रनच्या महत्त्वपूर्ण खेळी केल्या. दिल्लीकडून मुकेश कुमारने 2 विकेट घेतल्या. दुष्मंता चमीरा, मुस्तफिजूर आणि कुलदीप यादवला एक-एक विकेट घेण्यात यश आलं.
मुंबईने दिलेलं 181 रनचं आव्हान पार करण्यासाठी आलेल्या दिल्लीचा 18.2 ओव्हरमध्ये 121 रनवर ऑलआऊट झाला. मुंबईकडून मिचेल सॅन्टनरने 4 ओव्हरमध्ये फक्त 11 रन देऊन 3 विकेट घेतल्या, तर बुमराहने 3.2 ओव्हरमध्ये 12 रन देऊन 3 विकेट मिळवल्या. याशिवाय ट्रेन्ट बोल्ट, दीपक चहर, विल जॅक्स, आणि कर्ण शर्मा यांना प्रत्येकी 1-1 विकेट मिळाली. दिल्लीकडून समीर रिझवीने सर्वाधिक 39 रन केल्या तर विपराज निगमने 20 आणि आशुतोष शर्माने 18 रनची खेळी केली.
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
IPL 2025 : 230 बॉल बघितलेत, पण या 21 बॉलमुळे मुंबई प्ले-ऑफमध्ये, कुणाच्याच लक्षात नाही आलं!
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement