Mumbai Indians : मुंबईकरांना गुड न्यूज; पण MI ला टेन्शन, IMD च्या अलर्टने वाढल्या हार्दिकच्या हार्टबिट
- Published by:Shreyas Deshpande
Last Updated:
आयपीएल 2025 च्या प्ले-ऑफच्या तीन टीम निश्चित झाल्या आहेत. तर उरलेल्या एका जागेसाठी मुंबई आणि दिल्ली यांच्यात स्पर्धा आहे.
मुंबई : आयपीएल 2025 च्या प्ले-ऑफच्या तीन टीम निश्चित झाल्या आहेत. तर उरलेल्या एका जागेसाठी मुंबई आणि दिल्ली यांच्यात स्पर्धा आहे. बुधवारी मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर मुंबई आणि दिल्ली यांच्यात सामना होणार आहे, या सामन्यामध्ये प्ले-ऑफचं चित्र स्पष्ट होण्याची शक्यता आहे. या सामन्यात मुंबईने दिल्लीचा पराभव केला तर मुंबई प्ले-ऑफमध्ये पोहोचणारी चौथी टीम ठरेल. पण मुंबईने हा सामना गमावला तर दिल्ली विरुद्ध पंजाब आणि पंजाब विरुद्ध मुंबई या सामन्यानंतरच प्ले-ऑफमध्ये कोण पोहोचणार हे स्पष्ट होईल.
दिल्लीने उरलेल्या दोन्ही सामन्यांमध्ये मुंबई आणि पंजाबचा पराभव केला तर दिल्ली प्ले-ऑफला पोहोचेल. पण मुंबईविरुद्ध दिल्लीचा विजय झाला तसंच पंजाबने दिल्लीचा पराभव केला आणि मुंबईने पंजाबला धूळ चारली तरीही मुंबई प्ले-ऑफला पोहोचेल. आयपीएल पॉईंट्स टेबलमध्ये सध्या मुंबई चौथ्या आणि दिल्ली पाचव्या क्रमांकावर आहे. मुंबईने 12 पैकी 7 सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे, त्यामुळे त्यांचे 14 पॉईंट्स आहेत. तर दिल्लीचा 12 पैकी 6 सामन्यांमध्ये विजय झाला आणि त्यांचा एक सामना पावसामुळे रद्द झाला, त्यामुळे त्यांच्या खात्यात 13 पॉईंट्स आहेत.
advertisement
मुंबई-दिल्ली सामन्यावर पावसाचं संकट
मुंबई आणि दिल्ली यांच्यात होणाऱ्या सामन्यावर पावसाचं सावट आहे. हवामान खात्याने बुधवारी मुंबईमध्ये 70 टक्के पावसाची शक्यता वर्तवली आहे. पावसाची ही शक्यता उकाड्याने हैराण मुंबईकरांसाठी गुड न्यूज असली तरी यामुळे मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पांड्याच्या हार्टबिट मात्र वाढणार आहेत.
सामना रद्द झालं तर काय होणार?
मुंबई आणि दिल्ली यांच्यातला सामना पावसामुळे रद्द झाला तर दोन्ही टीमना एक-एक पॉईंट मिळेल, त्यामुळे 13 सामन्यांनंतर मुंबई 15 पॉईंट्स वर तर दिल्ली 14 पॉईंट्सवर जाईल. या परिस्थितीमध्ये दिल्ली आणि पंजाब यांच्यात होणारा सामना मुंबईसाठी महत्त्वाचा ठरेल. 24 मे रोजी होणाऱ्या या सामन्यात पंजाबने दिल्लीचा पराभव केला तर मुंबई प्ले-ऑफमध्ये पोहोचेल. पण दिल्लीने पंजाबला पराभूत केलं तर दिल्ली 16 पॉईंट्सवर पोहोचेल. दिल्लीने हा सामना जिंकला तर मुंबईला प्ले-ऑफला पोहोचण्यासाठी 26 मे रोजी पंजाबचा पराभव करावाच लागेल.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
May 20, 2025 5:08 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
Mumbai Indians : मुंबईकरांना गुड न्यूज; पण MI ला टेन्शन, IMD च्या अलर्टने वाढल्या हार्दिकच्या हार्टबिट