IPL 2025 : गुजरातच्या 'पठाण'ने बुडवलं गिलचं जहाज, 18 कोटींच्या बॉलरला पडल्या 33 सिक्स
- Published by:Shreyas Deshpande
Last Updated:
गुजरात टायटन्सचं आयपीएल 2025 मधील आव्हान संपुष्टात आलं आहे. एलिमिनेटरच्या सामन्यात मुंबई इंडियन्सने गुजरातचा 20 रननी पराभव केला.
मुंबई : गुजरात टायटन्सचं आयपीएल 2025 मधील आव्हान संपुष्टात आलं आहे. एलिमिनेटरच्या सामन्यात मुंबई इंडियन्सने गुजरातचा 20 रननी पराभव केला. गुजरातच्या बॅटरसाठी हा हंगाम खूपच खास होता. साई सुदर्शन आणि शुबमन गिल या ओपनरनी संपूर्ण मोसमात धावांचा डोंगर उभारला, पण मिडल ऑर्डर, फिनिशर आणि बॉलरनी गुजरातची निराशा केली. गुजरातचा मॅच विनर म्हणून ओळख मिळवणाऱ्या बॉलरची यंदाच्या मोसमातली कामगिरी लाजिरवाणी झाली आहे. गुजरातने त्याच्यावर बराच विश्वास दाखवला आणि त्याला 18 कोटी रुपयांना रिटेन केलं, पण त्याला या मोसमात छाप पाडता आली नाही.
आयपीएल 2025 हा हंगाम राशीद खानसाठी लाजिरवाणा ठरला. आपल्या जादुई बॉलिंगसाठी प्रसिद्ध असलेल्या राशीदला यावेळी मैदानावर जादू दाखवता आली नाही. 15 सामन्यांमध्ये फक्त 9 विकेट्स घेणाऱ्या या अफगाणी स्पिन बॉलरने आपल्या नावावर नको असलेला विक्रमही नोंदवला. राशीद आयपीएलच्या एकाच हंगामात सर्वाधिक सिक्स खाणारा बॉलर बनला, त्याने या हंगामात एकूण 33 सिक्स खाल्ले. ही आकडेवारी त्याच्या कारकिर्दीतील सर्वात वाईट कामगिरी आहे.
advertisement
मोहम्मद सिराजचा विक्रम मोडला
आपल्या अचूक बॉलिंगसाठी ओळखला जाणारा राशीद खान यंदाच्या मोसमात पुरता अपयशी ठरला. गुजरातकडून 15 सामने खेळताना त्याने 514 रन दिल्या, ज्यात त्याची सरासरी 57.11 एवढी होती. राशीदची आयपीएल कारकिर्दीतील ही सगळ्यात खराब कामगिरी आहे. या मोसमात राशीदने 9.34 च्या इकोनॉमी रेटने बॉलिंग केली. मुंबई इंडियन्सविरुद्धच्या एलिमिनेटरच्या सामन्यातही राशीदला एकही विकेट मिळाली नाही. राशिदने 4 ओव्हरमध्ये 31 रन दिल्या, ज्यात 2 सिक्स होत्या, यासोबतच राशीदच्या नावावर नको तो विक्रम झाला. आयपीएलच्या एकाच मोसमात सर्वाधिक सिक्स खाण्याचा मोहम्मद सिराजचा विक्रम राशीद खानने मोडला. याआधी सिराजला आयपीएलच्या एका मोसमात 31 सिक्स मारण्यात आल्या होत्या.
advertisement
याआधी एका हंगामात सर्वाधिक सिक्स खाण्याचा विक्रम मोहम्मद सिराजच्या नावावर होता. मोहम्मद सिराजने 2022 मध्ये 31 सिक्स खाल्ले. या यादीत वानिंदू हसरंगा (2022 मध्ये 30 सिक्स), युजवेंद्र चहल (2024 मध्ये 30 सिक्स) आणि ड्वेन ब्राव्हो (2018 मध्ये 29 सिक्स) यांच्यासारख्या दिग्गज बॉलर्सचाही समावेश आहे, पण राशीदचा 33 सिक्सचा आकडा आता या यादीत अव्वल क्रमांकावर आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
May 31, 2025 8:10 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
IPL 2025 : गुजरातच्या 'पठाण'ने बुडवलं गिलचं जहाज, 18 कोटींच्या बॉलरला पडल्या 33 सिक्स