RCB vs LSG : मोबाईल काढला अन् झहीरने विराटला दाखवली आत्तापर्यंत लपवून ठेवलेली गोष्ट, विराटचा आनंद गगनात मावेना; पाहा Video

Last Updated:

Zaheer Khan Show fatehsingh Photo to Virat : लखनऊ आणि आरसीबीच्या सामन्याआधी झहीर खानने विराट कोहलीला मोबाईल काढून काय दाखवलं? पाहा Video

Zaheer Khan Show fatehsingh Photo to Virat
Zaheer Khan Show fatehsingh Photo to Virat
Zaheer Khan Virat Kohli Viral Video : आयपीएल 2025 चा थरार आता अखेरच्या टप्प्यात आला आहे. प्लेऑफमध्ये पोहोचलेली आरसीबी 27 मे रोजी शेवटच्या लीग सामन्यात लखनऊ सुपर जायंट्सचा (RCB vs LSG) सामना करेल. हा सामना एकाना स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. या सामन्यापूर्वी एक व्हिडिओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. यामध्ये आरसीबीचा स्टार विराट कोहली आणि लखनऊचा कोच आणि वर्ल्ड कप विनिंग बॉलर झहीर खान गप्पा गोष्टी करताना दिसतायेत. त्यावर झहीरने विराटला धक्का दिला.

झहीरने विराटला फोनमध्ये काय दाखवलं?

झहीर आणि विराट यांचा एक व्हिडिओ LSG ने त्यांच्या अधिकृत एक्स अकाउंटवर शेअर केला आहे, ज्यामध्ये फ्रँचायझी मेटॉर झहीर खान आणि आरसीबी स्टार फलंदाज विराट कोहली बोलत असल्याचं दिसत आहे. या व्हिडिओमध्ये झहीर खान त्याच्या फोनवर किंग कोहलीला काहीतरी दाखवताना दिसत आहे. त्यांच्या संभाषणाचा व्हिडिओ आता वेगाने व्हायरल होत आहे. झहीरने यावेळी विराटला त्याला लाडक्या एका महिन्याच्या बाळाचा फोटो दाखवला, जो त्याने सोशल मीडियावर आत्तापर्यंत शेअर केला नाही.
advertisement

थांब तुला काहीतरी दाखवतो...

विराट आणि झहीर गप्पा मारत असताना झहीरने खिशात हात घातला आणि फोन बाहेर काढला. थांब तुला काहीतरी दाखवतो, असं झहीर म्हणाला. झहीरने आपल्या मुलाचा फोटो विराटला दाखवला. त्यावेळी विराटचा चेहरा आनंदाने फुलला. कसा आहे तो? असा सवाल विराटने केला. तर त्याचे डोळे तुझ्यावर गेलेत, असंही विराट यावेळी झहीरला म्हणताना दिसतोय. याचा व्हिडीओ लखनऊने शेअर केलाय.
advertisement

पाहा Video

फतेहसिंग खान 

दरम्यान, झहीर खानची पत्नी आणि बॉलिवूड अभिनेत्री सागरिका घाटगे हिने एका मुलाला जन्म दिला आहे. 16 एप्रिल रोजी सोशल मीडियावर पोस्ट करत दोघांनी गुड न्यूज दिली होती. एक ब्लॅक अँड व्हाईट फोटो शेअर करताना या जोडप्याने लिहिले की, 'प्रेम, कृतज्ञता आणि दैवी आशीर्वादांसह, आम्ही आमच्या गोड लहान बाळाचे, फतेह सिंग खानचे स्वागत करतो.' झहीर आणि सागरिकाच्या या पोस्टवर अनेकांनी अभिनंदनास्पद कमेंट्स आल्या होत्या.
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
RCB vs LSG : मोबाईल काढला अन् झहीरने विराटला दाखवली आत्तापर्यंत लपवून ठेवलेली गोष्ट, विराटचा आनंद गगनात मावेना; पाहा Video
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement