IPL 2026 : बेस प्राईजपेक्षा 4633 टक्के जास्त पैसे, CSK च्या बोलीने ऑक्शन टेबलवर खळबळ, कोण आहे कार्तिक शर्मा?
- Published by:Shreyas Deshpande
Last Updated:
आयपीएल 2026 च्या लिलावामध्ये अनकॅप्ड भारतीय खेळाडूंवर पैशांचा पाऊस पडला आहे. प्रशांत वीर आणि कार्तिक शर्मा हे आयपीएल इतिहासातील सगळ्यात महागडे अनकॅप्ड खेळाडू ठरले आहेत.
अबू धाबी : आयपीएल 2026 च्या लिलावामध्ये अनकॅप्ड भारतीय खेळाडूंवर पैशांचा पाऊस पडला आहे. प्रशांत वीर आणि कार्तिक शर्मा हे आयपीएल इतिहासातील सगळ्यात महागडे अनकॅप्ड खेळाडू ठरले आहेत. तर आकिब नबी डारला दिल्लीने 8.40 कोटी रुपयांना विकत घेतलं, तर प्रशांत वीर आणि कार्तिक शर्मा यांच्यासाठी सीएसकेने प्रत्येकी 14.20 कोटी रुपये मोजले. कार्तिक शर्माची बेस प्राईज 30 लाख रुपये होती, तरीही त्याच्यासाठी चेन्नईने 14 कोटी 20 लाख रुपये मोजले. याचसोबत कार्तिक शर्मा आयपीएल इतिहासातला सगळ्यात महागडा अनकॅप्ड भारतीय खेळाडू बनला.
कार्तिक शर्मावर सगळ्यात आधी बोली मुंबई इंडियन्सने लावली. यानंतर कोलकाता नाईट रायडर्स आणि लखनऊ सुपरजाएंट्स यांच्यात कार्तिक शर्मासाठी जोरदार बिडिंग वॉर झालं. लखनऊने माघार घेतल्यानंतर चेन्नईने केकेआरला टक्कर द्यायला सुरूवात केली, अखेर सीएसकेने 14.20 कोटींची बोली लावून 19 वर्षांच्या कार्तिक शर्माला विकत घेतलं. कार्तिक शर्मा विकेट कीपर बॅटर आहे.
कोण आहे कार्तिक शर्मा?
advertisement
कार्तिक शर्मा राजस्थानकडून स्थानिक क्रिकेट खेळतो. वादळी स्ट्राईक रेट आणि मोठे शॉट्स मारण्यासाठी कार्तिक शर्मा ओळखला जातो. सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी 2025-26 मध्ये राजस्थानकडून खेळताना कार्तिकने 5 सामन्यांमध्ये 160 च्या स्ट्राईक रेटने 133 रन केले आहेत. खालच्या क्रमांकावर बॅटिंगला येऊन कार्तिक मोठे शॉट्स मारून फिनिशरची भूमिका निभावतो.
कार्तिक शर्माने राजस्थानकडून खेळताना अंडर-14 आणि अंडर-16 मध्येही नाव कमावलं. टी-20 करिअरमध्ये कार्तिकने आतापर्यंत 12 सामन्यांमध्ये 334 रन केले आहेत, यात त्याचा स्ट्राईक रेट 163 च्या आसपास आहे. कार्तिक विकेट कीपरसोबतच पॉवर हिटरही आहे, त्यामुळे तो सीएसकेसाठी हुकमी एक्का ठरू शकतो.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
December 16, 2025 6:23 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
IPL 2026 : बेस प्राईजपेक्षा 4633 टक्के जास्त पैसे, CSK च्या बोलीने ऑक्शन टेबलवर खळबळ, कोण आहे कार्तिक शर्मा?










