advertisement

CSK चं नशीबच फुटकं.... डेथ ओव्हरसाठी बदली खेळाडू मागवला, पण त्यानेही धोकाच दिला!

Last Updated:

आयपीएल 2026 चा मोसम सुरू व्हायला आता फक्त 3 दिवस शिल्लक आहेत. शनिवार 28 मार्चला आयपीएलचा पहिला सामना खेळवला जाणार आहे, पण त्याआधी चेन्नई सुपरकिंग्सच्या अडचणी काही कमी व्हायचं नाव घेत नाहीयेत.

CSK चं नशीबच फुटकं.... डेथ ओव्हरसाठी बदली खेळाडू मागवला, पण त्यानेही धोकाच दिला!
CSK चं नशीबच फुटकं.... डेथ ओव्हरसाठी बदली खेळाडू मागवला, पण त्यानेही धोकाच दिला!
मुंबई : आयपीएल 2026 चा मोसम सुरू व्हायला आता फक्त 3 दिवस शिल्लक आहेत. शनिवार 28 मार्चला आयपीएलचा पहिला सामना खेळवला जाणार आहे, पण त्याआधी चेन्नई सुपरकिंग्सच्या अडचणी काही कमी व्हायचं नाव घेत नाहीयेत. सीएसकेचा फास्ट बॉलर आणि डेथ ओव्हर स्पेशलिस्ट नॅथन एलिस दुखापतीमुळे आयपीएलमधून बाहेर झाला, त्यानंतर सीएसकेने ऑस्ट्रेलियाचाच डावखुरा फास्ट बॉलर स्पेन्सर जॉनसनला टीममध्ये घेतलं, पण आता स्पेन्सर जॉनसनही सीएसकेच्या टीममध्ये लवकर येणार नसल्याचं समोर आलं आहे.
स्पेन्सर जॉनसन हा पाठीच्या दुखापतीतून सावरत आहे. या दुखापतीमुळे त्याला बिग बॅश लीगही खेळता आली नाही, त्यामुळे 21-23 एप्रिलच्या दरम्यान जॉनसन सीएसकेमध्ये सामील होऊ शकतो. आयपीएलचं पूर्ण वेळापत्रक अजून जाहीर झालेलं नसलं तरी जॉनसन सीएसकेच्या राजस्थान, पंजाब, आरसीबी आणि दिल्लीविरुद्धच्या सामन्यांमध्ये खेळू शकणार नाही. स्पेन्सर जॉनसन हा त्याचा शेवटचा स्पर्धात्मक सामना मागच्या आयपीएलमध्येच खेळला होता. केकेआरकडून खेळत असताना जॉनसनला पाठीचा त्रास सुरू झाला त्यानंतर त्याला स्ट्रेस फ्रॅक्चर झाले होते.
advertisement

एलिस आयपीएलमधून बाहेर

दुसरीकडे नॅथन एलिसला 11 मार्च रोजी ऑस्ट्रेलियातील स्थानिक वनडे कपच्या फायनलमध्ये हॅमस्ट्रिंगची दुखापत झाली, त्यामुळे एलिस स्पर्धेतून बाहेर झाला. एलिस बाहेर झाल्यानंतर सीएसकेने जॉनसनला 1.5 कोटी रुपयांना विकत घेतलं. 30 वर्षांचा जॉनसन ऑस्ट्रेलियाकडून 5 वनडे आणि 8 टी-20 आंतरराष्ट्रीय मॅच खेळला आहे, तसंच त्याला वेगवेगळ्या लीगमध्ये 71 टी-20 मॅचचा अनुभव आहे.
advertisement
आयपीएल 2024 च्या आधी गुजरातने जॉनसनला 10 कोटी रुपये देऊन विकत घेतलं. यानंतर 2025 मध्ये केकेआरने त्याला 2.80 कोटी रुपयांना विकत घेतलं, पण 2026 मध्ये जॉनसनवर कोणत्याच टीमने बोली लावली नाही. यानंतर जॉनसनने पीएसएल खेळण्याचा निर्णय घेतला, पण त्याने आता पीएसएलमधूनही माघार घेतली आहे.
view comments
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
CSK चं नशीबच फुटकं.... डेथ ओव्हरसाठी बदली खेळाडू मागवला, पण त्यानेही धोकाच दिला!
Next Article
IPLमधील 'डील'चे गूढ! संघाची 15,300 कोटींना विक्री; फक्त जुना मालक नाही, BCCIला देखील मिळाले पैसे, गणित वाचून चक्रावून जाल
IPLमधील 'डील'चे गूढ! संघाची 15,300 कोटींना विक्री; जुना मालक नाही, BCCIला देखील मिळाले पैसे, गणित वाचून चक्रावून जाल
  • राजस्थान रॉयल्सची 15,300 कोटींना विक्री

  • मालकाच्या खिशात 3,000 कोटी कमी का?

  • BCCIला किती मिळाले? चक्रावून टाकणारे गणित

View All
advertisement