IPL 2026 : राजस्थान रॉयल्सने दिली सर्वात मोठी हेडलाईन! शेन वॉर्नच्या 2008 चा चॅम्पियन खेळाडूचा 17 वर्षानंतर 'हल्ला बोल'
- Published by:Saurabh Talekar
Last Updated:
Ravindra Jadeja traded To Rajasthan Royals : आयपीएल 2026 च्या आधी चेन्नई सुपर किंग्जने रवींद्र जडेजा आणि सॅम करन यांच्या जागी राजस्थान रॉयल्समधून संजू सॅमसनला संधी दिली आहे.
CSK Official Announced Sanju Samson : गेल्या काही दिवसांपासून चर्चा सुरू असलेल्या ट्रेडवर अखेर अधिकृत घोषणा झाली आहे. राजस्थान रॉयल्सने संजू सॅमसनच्या बदल्यात चॅम्पियन खेळाडूला संघात सामील करून घेतलं आहे. संजू सॅमसन हा आता राजस्थान रॉयल्समध्ये नाही तर चेन्नई सुपर किंग्जकडून खेळताना दिसेल. त्याबदल्यात रविंद्र जडेजा आणि सॅम करन या दोन खेळाडूंना चेन्नईने राजस्थानकडे पाठवलं आहे.
रॉयल्सच्या CSK मध्ये संजू सॅमसनची एन्ट्री
आयपीएल 2026 च्या आधी चेन्नई सुपर किंग्जने रवींद्र जडेजा आणि सॅम करन यांच्या जागी राजस्थान रॉयल्सच्या संजू सॅमसनला संधी दिली आहे. चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स यांनी अधिकृतरित्या याची घोषणा केली आहे.
advertisement
सर्वात कठीण निर्णय
संघाच्या प्रवासात बदल कधीच सोपं नसतात. रवींद्र जडेजासारख्या खेळाडूला बाहेर काढणे, जो एका दशकाहून अधिक काळ फ्रँचायझीचा अविभाज्य भाग आहे आणि सॅम करन हा संघाच्या इतिहासातील आम्ही घेतलेल्या सर्वात कठीण निर्णयांपैकी एक होता, असं चेन्नई सुपर किंग्जने सांगितलं आहे.
SANJU SAMSON IS YELLOVE.
Anbuden welcome, Chetta! #WhistlePodu #Yellove pic.twitter.com/uLUfxIsZiU
— Chennai Super Kings (@ChennaiIPL) November 15, 2025
advertisement
दरम्यान, राजस्थान रॉयल्सने रविंद्र जडेजाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत याची माहिती दिली. यामध्ये जडेजा राजस्थानच्या 8 नंबरच्या जर्सीमध्ये दिसत आहे.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
November 15, 2025 10:40 AM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सने दिली सर्वात मोठी हेडलाईन! शेन वॉर्नच्या 2008 चा चॅम्पियन खेळाडूचा 17 वर्षानंतर 'हल्ला बोल'


