CSK ने धोनीला रिटेन केलं पण थाला फक्त 10 मिनिटंच मैदानात दिसणार, चेन्नईचा ड्रेसिंग रुमचा प्लॅन लीक!
- Published by:Saurabh Talekar
Last Updated:
MS Dhoni Play As Impact Player : यंदाच्या आयपीएलमध्ये देखील धोनी फक्त एक ते दोन ओव्हर बॅटिंग करताना दिसेल तर फिल्डिंगवेळी तो विकेटकीपिंग करताना दिसणार नाही.
IPL 2026 MS Dhoni Plan : चेन्नई सुपर किंग्जने रिटेन खेळाडूंची यादी जाहीर केली. अशातच आता सीएसकेने आपला स्टार प्लेयर महेंद्रसिंग धोनी याला कायम ठेवलं आहे. डेफिनेटली नॉट म्हणणाऱ्या थालाने यंदा देखील खेळण्याची तयारी दाखवली आहे. त्यामुळे चेन्नईच्या फॅन्सचा आनंद गगनात मावेना झाला आहे. अशातच धोनी फक्त 10 मिनिटंच मैदानात दिसणार असल्याचं समजतंय. चेन्नईच्या गोत्यात चाललंय काय? जाणून घ्या.
धोनीला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी नाही
महेंद्रसिंग धोनी आता 44 वर्षांचा झालाय. त्यामुळे मॅच खेळताना धोनीला पूर्ण योगदान देता येत नाहीये. तसेच विकेटकिपिंग करताना धोनीला त्रास होत असल्याचं मागील सिझनमध्ये दिसून आलं होतं. त्याचबरोबर बॅटिंगवेळी देखील धोनी क्वचित एखाद्या ओव्हरमध्ये बॅटिंगला येयचा. अशातच आता यंदाच्या आयपीएलमध्ये देखील धोनी फक्त एक ते दोन ओव्हर बॅटिंग करताना दिसेल तर फिल्डिंगवेळी तो विकेटकीपिंग करताना दिसणार नाही.
advertisement
संजू सॅमसनमुळे धोनीचा पत्ता कट
चेन्नई सुपर किंग्जने खेळाडू रिलीज करण्याआधी ट्रेड विंडोमध्ये मोठा डाव खेळला अन् संजू सॅमसनला राजस्थानकडून विकत घेतलं. त्यामुळे आता संजू सॅमसन नक्कीच प्लेईंग इलेव्हनमध्ये दिसेल. त्यामुळे धोनीचा प्लेइंग इलेव्हनमधून पत्ता कट होईल. धोनी आगामी आयपीएल हंगामात इम्पॅक्ट प्लेयर म्हणून दिसण्याची शक्यता आहे. त्यामुळे चाहत्यांचं मनोरंजन करण्यासाठी धोनी एखादी ओव्हर बॅटिंगला येईल. धोनी डगआऊटमधूनच चेन्नईची सुत्र हाताळेल, अशी शक्यता आहे.
advertisement
चेन्नईची बॅटिंग ऑर्डर मजबूत
दरम्यान, चेन्नई सुपर किंग्जची कॅप्टन्सी यंदा संजू सॅमसनकडे नाही तर ऋतुराज गायकवाडकडेच आहे. संजू फक्त विकेटकीपर बॅटर म्हणून खेळेल. मात्र, संजूच्या येण्याने चेन्नईची बॅटिंग ऑर्डर अधिक मजबूत झाली आहे, असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
November 16, 2025 10:11 AM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
CSK ने धोनीला रिटेन केलं पण थाला फक्त 10 मिनिटंच मैदानात दिसणार, चेन्नईचा ड्रेसिंग रुमचा प्लॅन लीक!


