Virat Kohli : 'सारखं डोकं खातो...', विराटच्या तक्रारीनंतर खेळ खल्लास, RCB ने एका झटक्यात टीमबाहेर काढलं!
- Published by:Shreyas Deshpande
Last Updated:
आयपीएल 2026 साठी सर्व 10 टीमनी त्यांनी रिटेन आणि रिलीज केलेल्या खेळाडूंची यादी जाहीर केली आहे. यानंतर आता 16 डिसेंबरला आयपीएलच्या पुढच्या मोसमासाठी लिलाव पार पडणार आहे.
मुंबई : आयपीएल 2026 साठी सर्व 10 टीमनी त्यांनी रिटेन आणि रिलीज केलेल्या खेळाडूंची यादी जाहीर केली आहे. यानंतर आता 16 डिसेंबरला आयपीएलच्या पुढच्या मोसमासाठी लिलाव पार पडणार आहे. आयपीएल 2025 जिंकणाऱ्या आरसीबीने 8 खेळाडूंना बाहेरचा रस्ता दाखवला आहे, तर 17 खेळाडूंना टीमने कायम ठेवलं आहे.
आरसीबीने रिलीज केलेले खेळाडू
मयंक अग्रवाल, लियाम लिव्हिंगस्टोन, लुंगी एनगिडी, ब्लेसिंग मुजरबानी, टीम सायफर्ट, मनोज भांडागे, मोहित राठी, स्वस्तिक चिकारा
आरसीबीने रिटेन केलेले खेळाडू
रजत पाटीदार, विराट कोहली, देवदत्त पडिक्कल, फिल सॉल्ट, जितेश शर्मा, कृणाल पांड्या, स्वप्नील सिंग, टीम डेव्हिड, रोमारियो शेफर्ड, जेकब बेथल, जॉश हेजलवूड, यश दयाळ, भुवनेश्वर कुमार, नुवान तुषारा, रसिख सलाम, अभिनंदन सिंग, सुयश शर्मा
advertisement
विराटला त्रास देणारा टीमबाहेर
आयपीएलच्या मागच्या मोसमात स्वस्तिक चिकारा वारंवार विराट कोहलीच्या मागे फिरायचा. तसंच आयपीएलच्या मागच्या मोसमात त्याने विराट कोहलीची बॅग उघडून त्याला न विचारताच त्याचा परफ्युम वापरला, याशिवाय त्याने विराटकडे त्याचं घड्याळही मागितलं. चिकाराच्या वाढदिवसाचं सेलिब्रेशन आरसीबीने केलं तेव्हा केक भरवताना स्वस्तिकने विराटचं बोटही चावलं आणि बर्थडे गिफ्ट म्हणून विराटकडे त्याचं घड्याळ मागितलं. यानंतर स्वस्तिकने विराटसोबत सेल्फीही घेतला, तेव्हा हा कायमच डोकं खात असतो, अशी प्रतिक्रिया दिली होती. याचा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.
advertisement
मूळचा उत्तर प्रदेशचा असलेला स्वस्तिक चिकारा विराट कोहलीला त्याचा आयडल मानतो, तसंच विराटची मेहनत आणि शिस्तीमधून खूप काही शिकण्यासारखं असल्याचं स्वस्तिक म्हणाला. आयपीएल 2025 च्या लिलावात स्वस्तिकला आरसीबीने 30 लाख रुपयांमध्ये विकत घेतलं होतं.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
November 15, 2025 11:08 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
Virat Kohli : 'सारखं डोकं खातो...', विराटच्या तक्रारीनंतर खेळ खल्लास, RCB ने एका झटक्यात टीमबाहेर काढलं!


