IPL Retention 2026 : अय्यर, मिलर, रसेल... 6 बॉलमध्ये मॅच फिरवणाऱ्या दिग्गजांना डच्चू, आयपीएल टीमचे 12 शॉकिंग निर्णय!

Last Updated:
आयपीएल 2026 साठी सर्व 10 टीमनी त्यांनी रिलीज आणि रिटेन केलेल्या खेळाडूंची यादी जाहीर केली आहे. या यादीमध्ये काही नावं धक्कादायक आहेत, जी पाहून चाहत्यांनाही विश्वास बसत नाहीये.
1/8
या यादीमध्ये सगळ्यात मोठं नाव व्यंकटेश अय्यरचं आहे, ज्याला केकेआरने 2025 च्या लिलावामध्ये 23.75 कोटी रुपयांमध्ये विकत घेतलं होतं, पण या रकमेला साजीशी कामगिरी त्याला करता आली नाही. आयपीएल 2025 मध्ये त्याला फक्त 142 रन करता आले, यानंतर आता केकेआरने त्याला रिलीज केलं आहे.

advertisement
2/8
याशिवाय केकेआरने वेस्ट इंडिजचा महान टी-20 क्रिकेटर आंद्रे रसेललाही सोडलं आहे. 2014 पासून रसेल केकेआरचा भाग आहे. 2025 च्या लिलावाआधी केकेआरने रसेलला 12 कोटींना रिटेन केलं होतं. पण मागच्या मोसमात 10 इनिंगमध्ये त्याला फक्त 167 रन करता आल्या. तर बॉलिंगमध्ये त्याने 11.94 च्या इकोनॉमी रेटने रन दिले आणि 8 विकेट घेतल्या.

3/8
मथिशा पथीराणाला सीएसकेने मागच्या आयपीएलमध्ये 13 कोटी रुपयांना रिटेन केलं होतं, पण दुखापत, फिटनेस आणि ऍक्शनमध्ये झालेल्या बदलामुळे पथीराणाला मागच्या मोसमात चांगली कामगिरी करता आली नाही. आयपीएल 2025 मध्ये पथीराणाने 12 मॅचमध्ये 10.13 च्या इकोनॉमी रेटने 13 विकेट घेतल्या.

4/8
आयपीएल 2025 जिंकणाऱ्या आरसीबीने मयंक अग्रवालला रिलीज केलं आहे. मयंक अग्रवाल आयपीएल 2025 च्या फायनलमध्ये फिल सॉल्टच्या ऐवजी खेळला होता. याशिवाय दक्षिण आफ्रिकेचा फास्ट बॉलर लुंगी एनगिडीलाही आरसीबीने बाहेरचा रस्ता दाखवला आहे.

5/8
राजस्थान रॉयल्सने त्यांचे श्रीलंकेचे दोन्ही स्पिनर वानिंदू हसरंगा आणि महीश तीक्षणाला रिलीज केलं आहे. हसरंगा हा सध्या टी-20 फॉरमॅटमधल्या सर्वोत्तम लेग स्पिनरपैकी एक आहे, तर महीश तीक्षणाही टी-20 स्पेशलिस्ट आहे, त्यामुळे या दोघांना रिलीज करण्याचा निर्णय अनेकांना आश्चर्यकारक वाटत आहे.

6/8
आयपीएलच्या पहिल्याच मोसमात प्रतिभावान युवा खेळाडू म्हणून कौतुक झालेल्या विघ्नेश पुथ्थुरला मुंबई इंडियन्सने सोडलं आहे. डावखुरा स्पिनर असलेल्या पुथ्थुरला मागच्या मोसमात फार खेळण्याची संधी मिळाली नसली, तरी त्याने काही सामन्यांमध्येच नाव कमावलं.

7/8
टी-20 फॉरमॅटमधला सर्वोत्तम फिनिशरपैकी एक असलेल्या डेव्हिड मिलरला लखनऊ सुपर जाएंट्सने रिलीज केलं आहे. याशिवाय लखनऊने लेग स्पिनर रवी बिष्णोईलाही रिलीज केलं आहे.

8/8
आयपीएल 2025 उपविजेता ठरलेल्या पंजाब किंग्सने ग्लेन मॅक्सवेल आणि जॉश इंग्लिसला रिलीज केलं आहे. मागच्या काही काळापासून मॅक्सवेलला आयपीएलमध्ये त्याच्या नावाला साजेशी कामगिरी करता आलेली नाही. तसंच जॉश इंग्लिस आयपीएल 2026 चा बहुतेक सिझन उपलब्ध नसेल, असं पंजाबचा कोच रिकी पॉन्टिंगने सांगितलं आहे.

Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement