Guess Who : रणवीर सिंहचा बॉडी डबल म्हणून सुरू केलं करिअर, आज हा अभिनेता अजय देवगणवर पडतोय भारी, कोण आहे तो?

Last Updated:
Bollywood Nepotism : बॉलिवूडमध्ये नेपोटीझम हा विषय नेहमीच चर्चेत असतो, पण या गर्दीत काही नेपो किड्स असे आहेत, जे केवळ कुटुंबाच्या नावावर नव्हे, तर कठोर परिश्रमावर विश्वास ठेवतात.
1/6
मुंबई: बॉलिवूडमध्ये नेपोटीझम हा विषय नेहमीच चर्चेत असतो, पण या गर्दीत काही नेपो किड्स असे आहेत, जे केवळ कुटुंबाच्या नावावर नव्हे, तर कठोर परिश्रमावर विश्वास ठेवतात. असाच एक अभिनेता सध्या चर्चेत आहे, ज्याने कॅमेऱ्यासमोर येण्यापूर्वी पडद्यामागे खूप मेहनत घेतली आहे.

advertisement
2/6
हा अभिनेता आहे, प्रसिद्ध कलाकार जावेद जाफरी यांचा मुलगा आणि दिग्गज कॉमेडियन जगदीप यांचा नातू मीजान जाफरी. मीजान जाफरी सध्या 'दे दे प्यार दे २' मुळे ओळखला जात असला तरी, त्याने इंडस्ट्रीत येण्यापूर्वी मोठी मेहनत केली आहे.

3/6
मीजानने अमेरिकेतून बिझनेसमध्ये पदवी घेतली, त्यानंतर न्यूयॉर्कमधून फिल्म डायरेक्शन आणि एडिटिंगचे शिक्षण घेतले. अभिनयात येण्यापूर्वी मीजानने संजय लीला भन्साळींसोबत 'बाजीराव मस्तानी', 'पद्मावत' आणि 'गंगूबाई काठियावाडी' या चित्रपटांसाठी असिस्टंट डायरेक्टर म्हणून काम केले.

4/6
'पद्मावत'च्या शूटिंगदरम्यान मीजानने रणवीर सिंगचा बॉडी डबल म्हणूनही काम केले होते. मीजानने २०१९ मध्ये संजय लीला भन्साळी यांच्या 'मलाल' चित्रपटातून अभिनयात पदार्पण केले, ज्यात त्याची बहीण शर्मिन सेहगलही होती. पण या चित्रपटाला यश मिळाले नाही.

5/6
यानंतर आलेले त्याचे 'हंगामा २' (२०२१), 'यारियां २' (२०२३), 'मिरांडा ब्रदर्स' (२०२४) आणि 'नादानियां' (२०२५) यांसारखे सलग चित्रपट बॉक्स ऑफिसवर आपटले. ६ फ्लॉपनंतरही मीजानने हार मानली नाही. आता त्याचा 'दे दे प्यार दे २' हा चित्रपट १४ नोव्हेंबरला रिलीज होत आहे.

6/6
'दे दे प्यार दे २' मध्ये मीजान जाफरी थेट सुपरस्टार अजय देवगनसोबत प्रेमाची लढाई लढताना दिसणार आहे. या चित्रपटात रकुल प्रीत सिंग, जावेद जाफरी, आर. माधवन आणि गौतमी कपूर देखील आहेत. सातत्याने प्रयत्न करणाऱ्या मीजानला हा चित्रपट मोठे यश देतो का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement