सोलापुरात राष्ट्रवादीला नंबर झाला, आता शिंदेंच्या शिवसेनेला दणका, दिग्विजय बागल भाजप प्रवेश करणार

Last Updated:

भाजपाने शिवसेना शिंदे गटाला मोठा धक्का दिला आहे. वीस हजार कार्यकर्त्यांसह दिग्विजय बागल भाजप प्रवेश करणार आहेत.

दिग्विजय बागल आणि जयकुमार गोरे
दिग्विजय बागल आणि जयकुमार गोरे
विरेंद्रसिंह उत्पात, प्रतिनिधी, सोलापूर: सोलापुरात अजित पवार यांच्या राष्ट्रवादीच्या दोन माजी आमदारांना गळाला लावल्यानंतर भाजपने आपला मोर्चा आता शिवसेना शिंदे गटाकडे वळवला आहे. नगरपालिका निवडणुकीचे पडघम वाजताच भाजपने सोलापूर जिल्ह्यात एकनाथ शिंदे गटाला मोठा धक्का दिलाय.
करमाळ्याचे शिवसेना शिंदे गटाचे नेते दिग्विजय बागल हे लवकरच भाजप प्रवेश करणार आहेत. त्यामुळे सोलापुर जिल्ह्यात ऑपरेशन लोटस अधिक गतीने सुरू असल्याचा दावा ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी केला आहे.

दिग्विजय बागल 20 हजार कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये प्रवेश करणार

करमाळ्यातील शिवसेनेचे नेते दिग्विजय बागल यांनी विधानसभा निवडणूक लढवली होती. यानंतर दिग्विजय बागल यांचे 55 शाखाप्रमुख आणि सेनेचे 20 हजार सभासदांनी राजीनामे दिले आहेत. हेच दिग्विजय बागल एक मोठी ताकद घेऊन भाजप प्रवेश करणार आहेत, अशी माहिती ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी दिली आहे.
advertisement

17 नोव्हेंबर रोजी नगराध्यक्षपदाचे उमेदवार जाहीर करणार

तसेच , सोलापूर जिल्ह्यातील 11 नगरपालिका आणि एक नगरपंचायत अशा बारा ठिकाणी भाजपच्या कमळ चिन्हावरच नगराध्यक्षपदाचे उमेदवार उभे केले जाणार आहेत. या सर्व उमेदवारांची घोषणा 17 नोव्हेंबर रोजी सकाळपर्यंत होईल. तसेच जिल्ह्यात अनेक ठिकाणी स्थानिक पातळीवर पक्षांच्या आघाड्या युती करून भाजप निवडणुका लढणार असल्याचेही जयकुमार गोरे यांनी सांगितले आहे.
advertisement

अजितदादांचे दोन आमदार भाजपच्या गळाला

सोलापूर जिल्ह्यातील मोहोळचे माजी आमदार यशवंत माने आणि राजन पाटील यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या तोंडावर भाजपमध्ये प्रवेश केला. दोन माजी आमदारांनी साथ सोडून गेल्याने अजित पवार यांना जिल्ह्यात मोठा धक्का बसला.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
सोलापुरात राष्ट्रवादीला नंबर झाला, आता शिंदेंच्या शिवसेनेला दणका, दिग्विजय बागल भाजप प्रवेश करणार
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement