Dhanush: 14 वर्षांचा संसार मोडला, आजही घटस्फोटाच्या दुःखात आहे धनुष; प्रेमाबद्दल हे काय बोलून गेला सुपरस्टार...

Last Updated:
Tere Ishk Mein : नुकतंच धनुषने प्रेम या विषयावर एक असे विधान केले, ज्यामुळे उपस्थितांच्या भुवया उंचावल्या आणि त्याचे हे वक्तव्य सोशल मीडियावर लगेच व्हायरल झाले.
1/9
मुंबई: सुपरस्टार धनुष आणि क्रिती सेनन हे लवकरच आनंद एल. राय दिग्दर्शित 'तेरे इश्क में' या चित्रपटातून पहिल्यांदाच एकत्र पडद्यावर दिसणार आहेत.

advertisement
2/9
मुंबईत नुकत्याच झालेल्या ट्रेलर लॉन्च इव्हेंटमध्ये धनुषने प्रेम या विषयावर एक असे विधान केले, ज्यामुळे उपस्थितांच्या भुवया उंचावल्या आणि त्याचे हे वक्तव्य सोशल मीडियावर लगेच व्हायरल झाले.

3/9
पत्रकारांनी धनुष आणि क्रितीला,
पत्रकारांनी धनुष आणि क्रितीला, "तुमच्यासाठी प्रेम काय आहे?" असा प्रश्न विचारला. यावेळी क्रितीने उत्तर देण्यासाठी धनुषकडे इशारा केला. काही सेकंद विचार करून धनुषने थेट सांगितले, "मला माहीत नाही." आणि पुढे तो म्हणाला, "मला वाटते की, हे फक्त एक ओव्हररेटेड इमोशन आहे!"
advertisement
4/9
धनुषच्या या विधानावर क्रिती आणि तिथे उपस्थित असलेल्या प्रत्येकालाच आश्चर्याचा धक्का बसला. क्रितीने लगेच प्रतिक्रिया देत म्हटले,
धनुषच्या या विधानावर क्रिती आणि तिथे उपस्थित असलेल्या प्रत्येकालाच आश्चर्याचा धक्का बसला. क्रितीने लगेच प्रतिक्रिया देत म्हटले, "मला नाही वाटत की शंकर (धनुषचे चित्रपटातील पात्र) तुमच्याशी सहमत असेल." यावर धनुष म्हणाला, "मी आधीच सांगितले, शंकर नावाचा कोणी नाही."
advertisement
5/9
धनुषने प्रेमाबद्दल केलेले हे विधान त्याच्या वैयक्तिक आयुष्यातील घटस्फोटाच्या पार्श्वभूमीवर खूप महत्त्वाचे मानले जात आहे. धनुष आणि सुपरस्टार रजनीकांत यांची मुलगी ऐश्वर्या यांनी २००४ मध्ये लग्न केले होते. १८ वर्षांच्या संसारानंतर २०२४ मध्ये त्यांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला.

6/9
दोघांनी संयुक्त निवेदन जारी करून म्हटले होते की,
दोघांनी संयुक्त निवेदन जारी करून म्हटले होते की, "पती-पत्नी म्हणून वेगळे होण्याचा आणि स्वतःला अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी वेळ देण्याचा आम्ही निर्णय घेतला आहे. कृपया आमच्या निर्णयाचा आदर करा आणि आम्हाला प्रायव्हसी द्या."
advertisement
7/9
काही महिन्यांपूर्वीच धनुषचे नाव मराठमोळी अभिनेत्री मृणाल ठाकूरसोबत जोडले जात होते. मृणाल ठाकूरच्या सन ऑफ सरदार २ च्या प्रीमिअरला धनुषही हजर होता. यावेळी मृणाल आणि धनुषला एकत्र स्पॉट करण्यात आले होते. यानंतर त्यांच्या अफेअरच्या अफवांना उधाण आले. मात्र दोघांनीही या अफवांवर कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही.

8/9
घटस्फोटानंतर 'प्रेम' या संकल्पनेवर धनुषने केलेले हे विधान, त्याच्या चित्रपटातील पात्रापेक्षा त्याच्या वास्तविक मनातील वेदना दर्शवत असल्याचा अंदाज चाहते लावत आहेत.

9/9
दरम्यान, 'तेरे इश्क में' हा चित्रपट २८ नोव्हेंबर २०२५ रोजी प्रदर्शित होणार आहे. धनुषने यापूर्वी आनंद एल. राय यांच्यासोबत 'रांझना' सारखा हिट चित्रपट केला आहे, तर क्रिती सेनन पहिल्यांदाच या दिग्दर्शकासोबत काम करत आहे.

Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement