Mumbai Indians: मुंबईचा माईंड गेम, पण शाहरूखला जमलाच नाही, पायावर धोंडा मारून बसला

Last Updated:

शाहरुख खानच्या कोलकत्ता संघाने मोठी चूक केली आहे.कारण काही वर्षापूर्वी अशीच परिस्थिती मुंबई इंडियन्सवर देखील आली होती. त्यावेळी मुंबई इंडियन्सने माईंड गेम खेळला होता.

shahrukh khan kolkatta knight riders
shahrukh khan kolkatta knight riders
Mumbai Indians News : आयपीएल 2026 साठी सगळ्या 10 च्या दहा संघाने आपली रिटेन आणि रिलीज केलेल्या खेळाडूची यादी जाहीर केली आहे. ही यादी जाहीर करताना शाहरुख खानच्या कोलकत्ता संघाने मोठी चूक केली आहे.कारण काही वर्षापूर्वी अशीच परिस्थिती मुंबई इंडियन्सवर देखील आली होती. त्यावेळी मुंबई इंडियन्सने माईंड गेम खेळला होता.तसाच गेम खेळण्यात आता शाहरूख खान अपयशी ठरला आहे. आता नेमका काय झाला आहे? हे जाणून घेऊयात.
आता झालं असं आहे की, शाहरूख खानच्या कोलकत्ता संघाने आंद्रे रसेल सह पाच खेळाडूंना रिलीज केले होते. आंद्रे रसेह हा वेस्ट इंडिजचा पावर हिटर खेळाडू आहे.हा खेळाडू ताबडतोब आणि धडाकेबाज खेळी करण्यास प्रसिद्ध आहे. आता याच खेळाडूला शाहरूख खानच्या कोलकत्ताने रिलीज केले आहे. एक असा खेळाडू आहे जो सामन्याचा निकाल कधीही पालटू शकतो त्याला अशाप्रकारे रिलीज करून कोलकत्ताने चूक केली आहे.ही चूक शाहरूखला आता कळणार नाही ती पुढे जाऊन कळेल.
advertisement
कारण आता पुढे रसेलला रिलीज केल्यामुळे त्याला संघात घेण्यासाठी सर्वच फ्रॅचायजी मागे लागतील.कारण असा खेळाडू कुणाला संघात नको असेल. त्यामुळे शाहरूखने रसेलला रिलीज करून हीच मोठी चूक केली आहे.त्यामुळे त्याला मोठा झटका बसणार आहे.
मुंबईने कसा डाव साधला?
खरं तर शाहरूख वर जी परिस्थिती आज ओढवली होती तशीच परिस्थिती मुंबई इंडियन्सवर काही वर्षापूर्वी ओढवली होती. मुंबई इंडियन्ससाठी किरण पोलार्ड 13 हंगाम आयपीएल खेळला, 2010 ते 2022.त्यानंतर मुंबई त्याला रिलीज करू शकली असती पण असा धडाकेबाज फलंदाज इतर संघात जाऊ नये म्हणून मुंबईने त्याला निवृत्ती घ्यायला लावले आणि मुंबईचा बॅटींग कोच केला. त्यामुळे मुंबईने या ठिकाणी माईंडगेम खेळून पोलार्डला कायमचा आपल्याकडे घेऊन ठेवला. पोलार्ड आता मुंबईसाठी इतर लीग खेळतोय फक्त तो आयपीएलमध्ये खेळत नाही. त्यामुळे मुंबईने त्यावेळी घेतलेला तो निर्णय खूपच भारी होता.असाच निर्णय़ घेण्यात आता शाहरूखची कोलकत्ता अपयशी ठरली आहे.त्यामुळे आता शाहरूखला हा निर्णय किती भारी पडतो?हे पुढे कळणार आहे.
advertisement
मुंबईने कुणाला सोडलं?
सत्यनारायण राजू (30 लाख)
रीस टॉपली ( 75 लाख)
के श्रीजित ( 30 लाख)
कर्ण शर्मा ( 50 लाख)
अर्जुन तेंडुलकर (30 लाख)
बेवॉन जेकब्स (30 लाख)
मुजीब उर रहमान (2 कोटी)
लिझार्ड विलियम्स (75 लाख)
विघ्नेश पुथ्थुर (30 लाख)
मुंबईने रिटेन केलेले खेळाडू
अल्लाह गझनफर, अश्विनी कुमार, कॉर्बिन बॉश, दीपक चहर, हार्दिक पांड्या, जसप्रीत बुमराह, मयंक मार्कंडे, मिचेल सॅन्टनर, नमन धीर, रघू शर्मा, राज अंगद बावा, रॉबिन मिन्झ, रोहित शर्मा, रियान रिकलटन, शार्दुल ठाकूर, शरफेन रदरफोर्ड, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, ट्रेन्ट बोल्ट, विल जॅक्स
view comments
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
Mumbai Indians: मुंबईचा माईंड गेम, पण शाहरूखला जमलाच नाही, पायावर धोंडा मारून बसला
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement