IPL Auction 2025 : 9 वर्षाच्या वयात अंडर 14 संघाला बनवलं चॅम्पियन, कोण आहे अनकॅप खेळाडू?
- Published by:Prashant Gomane
Last Updated:
9 वर्षाच्या असताना अंडर 19 संघाला चॅम्पियन बनवणाऱ्या एका खेळाडूला लखनऊ सुपर जाएटसने ताफ्यात घेतलं आहे. लखनऊने 2.20 कोटी रूपयाला त्याला संघात केलं आहे. त्यामुळे हा अनकॅप खेळाडू नेमका कोण आहे? हे जाणून घेऊयात.
IPL Auction 2025 : आयपीएल 2026चा मिनी लिलाव अंतिम टप्प्यात पोहोचत आला आहे.या लिलावात तरूण खेळाडू भाव खाऊन चालले आहेत. या दरम्यान 9 वर्षाच्या असताना अंडर 19 संघाला चॅम्पियन बनवणाऱ्या एका खेळाडूला लखनऊ सुपर जाएटसने ताफ्यात घेतलं आहे. लखनऊने 2.20 कोटी रूपयाला त्याला संघात केलं आहे. त्यामुळे हा अनकॅप खेळाडू नेमका कोण आहे? हे जाणून घेऊयात.
advertisement
हा अनकॅप खेळाडू दुसरा तिसरा कुणी नसून अक्षत रघुवंशी आहे. अक्षत रघुवंशीला संघात घेण्यासाठी लखनऊ सूपर जाएटस आणि सनरायझर्स हैदराबाद या संघात चढाओढ सूरू होती. शेवटी लखनऊने बाजी मारून 2.20 करोड रूपयात त्याला ताफ्यात घेतले आहे.
advertisement
अक्षत रघुवंशी हा एक युवा भारतीय क्रिकेटर आहे. तो उजव्या हाताचा आक्रमक फलंदाज असून मध्य प्रदेश संघाकडून देशांतर्गत क्रिकेट खेळतो. अक्षत 2022-23 सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये तो मध्य प्रदेशच्या अंडर-19 आणि अंडर-23 संघाचा कर्णधार राहिला आहे.नुकत्याच झालेल्या मध्य प्रदेश लीग (MPL) मध्ये त्याने दमदार कामगिरी केली, ज्यामुळे IPL स्काऊट्सचे लक्ष वेधले.
advertisement
अक्षतच्या वडिलांनी दिलेल्या माहितीनुसार, तीन वर्षाच्या असताना त्याने हातात बॅट धरली होती. पहिल्यांदा तो घरातच क्रिकेट खेळायचा. त्यानंतर 5 वर्षाच्या असताना तो गल्लीबोळात रबरच्या बॉलने खेळताना चौकार आणि षटकार मारायचा. त्यानंतर 9 वर्षांच्या वयातच त्याने अंडर 14 मध्ये अशोकनगरला फायनलमध्ये जिंकवून दिले होते. त्यामुळे असा हा प्रतिभावान खेळाडू आता लखनऊ सूपर जाएटसच्या ताफ्यात आला आहे.
advertisement
22 वर्षीय रघुवंशीने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये मेघालयविरुद्ध पदार्पणात शतक झळकावले आणि त्यानंतर दुसऱ्या सामन्यात अर्धशतक झळकावले. त्याने विनू मंकड ट्रॉफीमध्ये मध्य प्रदेशच्या 19 वर्षांखालील संघाचे नेतृत्वही केले, ज्यामुळे त्याच्या फलंदाजीच्या प्रतिभेसह त्याची नेतृत्व क्षमता अधोरेखित झाली.
advertisement
तांत्रिकदृष्ट्या सुदृढ आणि त्याच्या वयासाठी प्रौढ मानल्या जाणाऱ्या रघुवंशीने फक्त सात अधिकृत टी20 सामने खेळले आहेत, परंतु स्काउट्स प्रियांश आर्यच्या तालावर भविष्यातील आयपीएल ब्रेकआउट म्हणून त्याला पाहतात. त्याने मध्य प्रदेशच्या भोपाळ लिओपर्ड्सविरुद्ध स्थानिक टी20 लीगमध्ये 45 चेंडूत जलद 105 धावा काढल्या आणि 177 च्या स्ट्राइक रेटने चार डावांमध्ये 239 धावा केल्या.
advertisement
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
December 16, 2025 7:39 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
IPL Auction 2025 : 9 वर्षाच्या वयात अंडर 14 संघाला बनवलं चॅम्पियन, कोण आहे अनकॅप खेळाडू?










