advertisement

Krushi Market Rate: बाजारात तिळाचा भाव 15,000च्या पार, स्वस्त काय?

Last Updated:

मंगळवार, दिनांक 16 डिसेंबर रोजी राज्यातील कृषी मार्केटमध्ये आवक झालेल्या महत्त्वाच्या शेतमालांच्या अपडेट्स जाणून घेऊ. आज आपण महत्त्वाच्या तीन शेतमालांमध्ये आले, गुळ आणि तीळाची आवक व भाव पाहू.

+
Krushi

Krushi Market 

मुंबई: मंगळवार, दिनांक 16 डिसेंबर रोजी राज्यातील कृषी मार्केटमध्ये आवक झालेल्या महत्त्वाच्या शेतमालांच्या अपडेट्स जाणून घेऊ. आज आपण महत्त्वाच्या तीन शेतमालांमध्ये आले, गुळ आणि तीळाची आवक व भाव पाहू.
गुळास चांगला उठाव: राज्याच्या मार्केटमध्ये 1810 क्विंटल गुळाची एकूण आवक झाली. यापैकी 737 क्विंटल सर्वाधिक आवक मुंबई बाजारात झाली. त्यास प्रतीनुसार 5200 ते 5700 रुपयांपर्यंत बाजार भाव मिळाला. तसेच जालना, सोलापूर, पुणे मार्केटमध्ये गुळाचा दर साधारणपणे तीन हजार ते चार हजार शंभर रुपये दरम्यान राहिला.
आले दरात चढ-उतार: राज्याच्या मार्केटमध्ये 2897 क्विंटल आल्याची एकूण आवक झाली. यापैकी मुंबई मार्केटमध्ये 1110 क्विंटल सर्वाधिक आवक राहिली. त्यास प्रतीनुसार 3800 ते 5600 रुपये प्रतिक्विंटल बाजार भाव मिळाला. तसेच नागपूर मार्केटमध्ये आवक झालेल्या 966 क्विंटल आल्यास प्रतीनुसार 4343 ते 6677 रुपये सर्वाधिक बाजारभाव मिळाला.
advertisement
तीळाची उच्चांकी आवक: आज राज्याच्या मार्केटमध्ये 674 क्विंटल तीळाची एकूण आवक राहिली. यापैकी मुंबई मार्केटमध्ये 664 क्विंटल तीळाची सर्वाधिक आवक झाली. त्यास प्रतीनुसार 12500 ते 17000 हजार रुपये सर्वाधिक बाजारभाव मिळाला.
view comments
मराठी बातम्या/कृषी/
Krushi Market Rate: बाजारात तिळाचा भाव 15,000च्या पार, स्वस्त काय?
Next Article
एका रात्रीत भारतीयांनी ChatGPTचा नाद सोडला, मग कोणते App डाऊनलोड केले? नाव ऐकून बसेल आश्चर्याचा धक्का!
एका रात्रीत भारतीयांनी ChatGPTचा नाद सोडला, मग कोणते App डाऊनलोड केले?
  • भारतीय धडाधड डाऊनलोड करतायत हे App

  • ॲपसाठी उडाली झुंबड

  • नाव वाचून थक्क व्हाल

View All
advertisement