IPL लिलावात काहीतरी मोठं घडणार, मुंबईच्या कोचचा इशारा, कोणते खेळाडू टार्गेटवर?

Last Updated:

आयपीएलने मागच्या काही वर्षांमध्ये टीम इंडियाला अनेक दिग्गज खेळाडू दिले आहेत, जे विरोधी टीमसाठी संकट बनले, यातले बरेचसे खेळाडू हे मुंबई इंडियन्सने भारतीय टीमला दिले आहेत.

IPL लिलावात काहीतरी मोठं घडणार, मुंबईच्या कोचचा इशारा, कोणते खेळाडू टार्गेटवर?
IPL लिलावात काहीतरी मोठं घडणार, मुंबईच्या कोचचा इशारा, कोणते खेळाडू टार्गेटवर?
मुंबई : आयपीएलने मागच्या काही वर्षांमध्ये टीम इंडियाला अनेक दिग्गज खेळाडू दिले आहेत, जे विरोधी टीमसाठी संकट बनले, यातले बरेचसे खेळाडू हे मुंबई इंडियन्सने भारतीय टीमला दिले आहेत. आयपीएलच्या प्रत्येक मोसमात मुंबई अशा नव्या खेळाडूंना शोधत असते. मुंबई इंडियन्स लिलावामध्ये अशा अनेक अज्ञात नावांवर बोली लावते आणि रात्रीतून हे खेळाडू हिरे बनतात. यंदाही मुंबई इंडियन्स आयपीएल लिलावासाठी सज्ज आहे. आयपीएल 2026 साठीचा मिनी ऑक्शन 16 डिसेंबरला होणार आहे. आयपीएल लिलावाआधी मुंबई इंडियन्सचे प्रशिक्षक महेला जयवर्धने यांनी महत्त्वाचे संकेत दिले आहेत.
महेला जयवर्धने यांनी सांगितले आहे की ते लिलावात अनकॅप्ड देशांतर्गत खेळाडूंवर देखील अवलंबून राहू शकतात. जिओहॉटस्टारवर बोलताना ते म्हणाले, 'मुंबई इंडियन्स रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, जसप्रीत बुमराह, हार्दिक पांड्या आणि तिलक वर्मा यांच्यासारख्या प्रभावी खेळाडूंच्या मुख्य गटावर अवलंबून राहील. गेल्या हंगामात ट्रेंट बोल्टच्या पुनरागमनामुळे टीमची बॉलिंग बळकट झाली. मिचेल सँटनर आणि विल जॅक्स सारख्या खेळाडूंनीही टीमला बळकटी दिली आहे'
advertisement

तरुण खेळाडूंमध्ये सुधारणा

'गेल्या हंगामापेक्षा आमच्या तरुण खेळाडूंमध्ये लक्षणीय सुधारणा झाली आहे आणि आम्हाला आशा आहे की त्यांना या वर्षी त्यांचे कौशल्य दाखवण्याची संधी मिळेल. आम्ही लिलावात देशांतर्गत खेळाडूंवर लक्ष केंद्रित करू', असं जयवर्धने यांनी सांगितलं. लिलावापूर्वी, मुंबई इंडियन्सने सात खेळाडूंना रिलीज केले, ज्यात कर्ण शर्मा, बेव्हॉन जेकब्स, मुजीब उर रहमान, विघ्नेश पुथूर, केएल श्रीजीत, पीएसएन राजू, रीस टोपली आणि लिझार्ड विल्यम्स यांचा समावेश आहे, तर अर्जुन तेंडुलकरला मुंबईने लखनऊकडे ट्रेड केलं.
advertisement

मुंबई प्ले-ऑफमधून बाहेर

आयपीएल 2025 मध्ये मुंबई इंडियन्सची सुरूवात खराब झाली, पण त्यानंतर टीमने जोरदार पुनरागमन करत प्ले-ऑफमध्ये प्रवेश केला. एलिमिनेटरचा सामना जिंकल्यानंतर क्वालिफायर-2 मध्ये मुंबईचा पंजाब किंग्सने पराभव केला. आयपीएल 2024 मध्ये मात्र टीमची कामगिरी निराशाजनक झाली होती. सर्वाधिक 5 वेळा आयपीएल ट्रॉफी जिंकलेल्या मुंबईला 2020 नंतर एकदाही जेतेपद पटकावता आलेलं नाही, त्यामुळे यंदाच्या मोसमात सहावी ट्रॉफी जिंकण्याची तयारी मुंबईने सुरू केली आहे.
view comments
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
IPL लिलावात काहीतरी मोठं घडणार, मुंबईच्या कोचचा इशारा, कोणते खेळाडू टार्गेटवर?
Next Article
advertisement
Kolhapur News: खेळताना घरावर गेलेला चेंडू काढायला गेला अन् काळानं गाठलं, १३ वर्षाच्या अफानसोबत घडलं भयंकर
घरावर गेलेला चेंडू काढायला गेला अन्.., १३ वर्षाच्या अफानसोबत घडलं भयंकर
  • घरावर गेलेला चेंडू काढायला गेला अन्.., १३ वर्षाच्या अफानसोबत घडलं भयंकर

  • घरावर गेलेला चेंडू काढायला गेला अन्.., १३ वर्षाच्या अफानसोबत घडलं भयंकर

  • घरावर गेलेला चेंडू काढायला गेला अन्.., १३ वर्षाच्या अफानसोबत घडलं भयंकर

View All
advertisement