IPL Auction 2026 : 3 ओव्हरमध्ये 58 रन्स,सकाळी मुंबईने धू धू धुतलं, संध्याकाळी लिलावात भावच उतरला
- Published by:Prashant Gomane
Last Updated:
मुंबईच्या खेळाडूंनी प्रचंड धुलाई करून 3 ओव्हरमध्ये 58 धावा काढल्या होत्या. त्यामुळे सकाळी धुलाई झाल्यानंतर संध्याकाळी हा खेळाडू आयपीएलच्या लिलावात अनसोल्ड ठरला आहे. त्यामुळे हा खेळाडू नेमका कोण आहे?
IPL Auction 2026 : आयपीएल 2026 च्या मेगा लिलावाला आज अबुधाबीमध्ये सुरूवात झाली आहे. या लिलावात 369 खेळाडूंवर बोली लागणार असून 77 खेळाडूंची खरेदी केली जाणार आहे. या लिलावाआधी एक खेळाडू सकाळी सामना खेळत होता. या खेळाडूची मुंबईच्या खेळाडूंनी प्रचंड धुलाई करून 3 ओव्हरमध्ये 58 धावा काढल्या होत्या. त्यामुळे सकाळी धुलाई झाल्यानंतर संध्याकाळी हा खेळाडू आयपीएलच्या लिलावात अनसोल्ड ठरला आहे. त्यामुळे हा खेळाडू नेमका कोण आहे? हे जाणून घेऊयात.
हा खेळाडू दुसरा तिसरा कुणी नसून राहुल चहर आहे. राहुल चहर हा सध्या राजस्थान संघाकडून सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी स्पर्धा खेळतो आहे. या स्पर्धेत आज मुंबई आणि राजस्थानचा सामना रंगला होता.या स्पर्धेत मुंबईच्या खेळाडूंनी राहुल चहरची प्रचंड धुलाई केली होती. राहुल चहरच्या 3 ओव्हरमध्ये मुंबईच्या खेळाडूंनी 58 धावा कुटल्या होत्या. विशेष म्हणजे ही सगळी धुलाई आयपीएल 2026 लिलावाला काही तास बाकी असताना झाली होती.
advertisement
आधीच बॉलिंग खराब झाली त्यात आयपीएल लिलावात त्याला मोठी बोली लागेल अशी अपेक्षा होती. पण राहुल चहर हा अनसोल्ड ठरला आहे. राहुल चहरची बेस प्राईज 1 कोटी रूपये होती. पण त्याला कोणत्याही फ्रेंचायजीने संघात घेण्यास उत्सुकता दाखवली नाही.त्यामुळे तो अनसोल्ड राहिला आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
December 16, 2025 4:40 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
IPL Auction 2026 : 3 ओव्हरमध्ये 58 रन्स,सकाळी मुंबईने धू धू धुतलं, संध्याकाळी लिलावात भावच उतरला











