Ravindra Jadeja : धोनीनेच जडेजाला राजस्थानकडे पाठवलं, CSK चा खळबळजनक निर्णय, धक्कादायक कारण समोर!
- Published by:Shreyas Deshpande
Last Updated:
टीम इंडियाचा ऑलराऊंडर रवींद्र जडेजाने चेन्नई सुपर किंग्सची साथ सोडली आहे. आयपीएल ट्रेड डीलमध्ये सीएसकेने जडेजा आणि सॅम करन यांना राजस्थान रॉयल्सला दिलं आहे.
चेन्नई : टीम इंडियाचा ऑलराऊंडर रवींद्र जडेजाने चेन्नई सुपर किंग्सची साथ सोडली आहे. आयपीएल ट्रेड डीलमध्ये सीएसकेने जडेजा आणि सॅम करन यांना राजस्थान रॉयल्सला दिलं आहे, तर या बदल्यात त्यांनी संजू सॅमसनला टीममध्ये घेतलं आहे. 12 वर्ष सीएसकेकडून खेळल्यानंतर जडेजाने असा निर्णय का घेतला? जडेजाला टीम सोडण्यास भाग पाडलं गेलं का राजस्थानने त्याला मोठी ऑफर दिली? अशा अनेक चर्चा सुरू झाल्या आहेत. त्यातच आता एमएस धोनी आणि रवींद्र जडेजा यांच्यामध्ये ही ट्रेड डील व्हायच्या आधी बरीच चर्चा झाल्याचं वृत्त समोर आलं आहे.
क्रिकबझच्या वृत्तानुसार ट्रेड डील होण्याआधी जडेजा आणि धोनी यांच्यात या विषयावर चर्चा झाली, तसंच जडेजाचं सीएसके सोडणं सर्वांच्या हिताचं असेल, असं या दोघांनाही वाटलं. नूर अहमद सीएसकेच्या टीममध्ये आल्यामुळे टीम मॅनेजमेंटला जडेजाच्या टीममधल्या भूमिकेसाठी वेगवेगळे पर्याय शोधावे लागणार होते, यामुळे त्याचं प्लेइंग इलेव्हनमधील स्थानही धोक्यात आलं असतं. चेन्नईची खेळपट्टीही आता स्पिन बॉलिंगला मदत करणारी राहिलेली नाही. धोनीने याबद्दल जडेजाला उघडपणे सांगितलं, त्यानंतर जडेजानेही सीएसके सोडण्यासाठी सहमती दर्शवली.
advertisement
गेल्या वर्षी रवींद्र जडेजाला सीएसकेने 18 कोटी रुपयांना रिटेन केले होते, पण या मोसमात त्याला 14 कोटी रुपयांना ट्रेड केलं गेलं. जडेजा 14 कोटी रुपयांसाठी सीएसके सारखी टीम सोडून राजस्थानकडे जातोय, हे पटण्यासारखं नसल्याची प्रतिक्रिया माजी क्रिकेटपटू आकाश चोप्राने दिली आहे. राजस्थानने त्याला कोणती महत्त्वाची भूमिका ऑफर केली असेल, तरच जडेजा पैसे कमी करून राजस्थानमध्ये गेला असेल, असं वक्तव्य आकाश चोप्राने केलं आहे.
advertisement
आयपीएल 2022 दरम्यान रवींद्र जडेजा आणि टीम मॅनेजमेंटमध्ये वाद झाले होते, ज्यानंतर जडेजाला अर्ध्या आयपीएलमध्येच कर्णधारपदावरून हटवण्यात आलं होतं, पण यावेळी मात्र जडेजा आणि सीएसके सौहार्दपूर्ण आणि कोणत्याही वादाशिवाय वेगळे झाले आहेत, असंही क्रिकबझच्या वृत्तात स्पष्ट करण्यात आलं आहे. रवींद्र जडेजा सीएसकेकडून 185 मॅच खेळला, ज्यात त्याने 2000 पेक्षा जास्त रन केले आणि 140 विकेट घेतल्या. याशिवाय तो चॅम्पियन्स लीग टी-20 मध्येही सीएसकेकडून 14 मॅच खेळला.
view commentsLocation :
Chennai,Tamil Nadu
First Published :
November 15, 2025 11:39 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
Ravindra Jadeja : धोनीनेच जडेजाला राजस्थानकडे पाठवलं, CSK चा खळबळजनक निर्णय, धक्कादायक कारण समोर!


