advertisement

ZIM vs IRE : मोक्याच्या क्षणी झिम्बाबेच्या मदतीला 'तो' आला, मॅच सुरु होण्याआधीच ऑस्ट्रेलियाचा अलगद काटा काढला

Last Updated:

खरं तर ऑस्ट्रेलियाला सूपर 8 मध्ये पोहोचण्यासाठी झिम्बाबे आणि आयर्लंड यांच्या विरूद्धच्या सामन्यातील निकालावर अवलंबून राहावे लागणार आहे.

ZIM vs IRE
ZIM vs IRE
Zimbabwe vs Ireland : टी20 वर्ल्डकप 2026 मध्ये सोमवारी श्रीलंकेने ऑस्ट्रेलियाचा पराभव करून सूपर 8 मध्ये धडक मारली होती. तर या पराभवाने ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का बसला होता. कारण ऑस्ट्रेलियाची सूपर 8 मध्ये पोहोचण्याची वाट आणखीन बिकट झाली होती. त्यात आता ऑस्ट्रेलियाला झिम्बाबे आणि आयर्लंड विरूद्ध सामन्याच्या निकालावर अवबंलून रहावे लागणार आहे. पण आता झिम्बाबे आणि आयर्लंड विरूद्ध सामन्यात पावसाने खोडा घातला आहे. त्यामुळे पावसामुळे ऑस्ट्रेलियाचा गेम झाल्यात जमा आहे, असेच वाटते आहे.
खरं तर ऑस्ट्रेलियाला सूपर 8 मध्ये पोहोचण्यासाठी झिम्बाबे आणि आयर्लंड यांच्या विरूद्धच्या सामन्यातील निकालावर अवलंबून राहावे लागणार आहे. या सामन्याचा टॉस 2.30 वाजता होणार होता. पण तो अद्याप होऊ शकलेला नाही.कारण श्रीलंकेच्या पल्लीकेले स्टेडिअमवर पाऊस पडतो आहे.त्यामुळे सामना सूरू होण्यास उशीर होणार आहे. पण जर पाऊस असाच सूरू राहिला तर सामना रद्द करावा लागेल. या परिस्थितीत दोन्ही संघाना एक एक गुण दिले जाणार आहेत.अशाप्रकारे एक गुण मिळवून झिम्बाबे तीन सामन्यात 5 गूणांसह थेट सूपर 8 मध्ये पोहोचणार आहे. तर आयर्लंडचे 4 सामन्यात तीन गुण होणार आहेत त्यामुळे ते या स्पर्धेतून बाहेर होणार आहेत.
advertisement
ऑस्ट्रेलियाचं काय होणार?
जर खरंच पावसामुळे सामना होऊच शकला नाही तर ऑस्ट्रेलियाचा गेमच झाला म्हणायचं. कारण ऑस्ट्रेलियाचा सूपर 8 मध्ये पोहोचण्यासाठी झिम्बाबेचा आयर्लंडने पराभूत करणे आवश्यक आहे. यासह ऑस्ट्रेलियाला ओमान विरुद्धचा सामना मोठ्या फरकाने जिंकणे आवश्यक आहे. पण जर पावसामुळे हा सामना रद्द झाला तर झिम्बाबे सूपर 8 मध्ये पोहोचणार आहे. त्यामुळे ऑस्ट्रेलियाच्या उरल्या सूरलेल्या आशा संपुष्ठात येणार आहेत.
advertisement
ऑस्ट्रेलिया ओमान विरूद्ध शेवटचा सामना खेळेल,पण या सामन्यामुळे ते जास्तीत जास्त 4 गुणांपर्यंत पोहोचू शकणार आहेत. त्यामुळे या विजयाचा ऑस्ट्रेलियाला काहीच फायदा होणार नाही आहे आणि ते ग्रुप स्टेजमधूनच बाहेर होणार आहेत.
दरम्यान अद्याप तरी सामना रद्द करण्यात आला नाही आहे. सुरूवातीला सामन्याचे काही ओव्हर घटवले जाण्याची शक्यता आहे. त्यानंतरही जर पाऊस सूरूच राहिला तर सामना रद्द होणार आहे.
view comments
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
ZIM vs IRE : मोक्याच्या क्षणी झिम्बाबेच्या मदतीला 'तो' आला, मॅच सुरु होण्याआधीच ऑस्ट्रेलियाचा अलगद काटा काढला
Next Article
advertisement
बाजारात मोठी उलथापालथ, सोने 58 हजाराने कोसळणार; भारतात दर 1 लाखाच्या खाली येणार, कनेक्शनवर धक्कादायक अंदाज
बाजारात उलथापालथ, सोन्याच्या किंमती 58 हजाराने कोसळणार; दर 1 लाखाच्या खाली येणार
  • सोनं खरेदीपूर्वी थांबा

  • भारतात दर १ लाखाच्या खाली येणार

  • तज्ज्ञांची मोठी भविष्यवाणी

View All
advertisement