Kartik Sharma : चेन्नईने 14.20 कोटींची बोली लावली अन् कार्तिक शर्मा ढसाढसा रडला, मालती चहरशी खास कनेक्शन!
- Published by:Saurabh Talekar
Last Updated:
CSK Kartik Sharma Viral Video : 4.20 कोटींची बोली लागल्यानंतर कार्तिकला अश्रू अनावर झाले. आज पहिल्यांदा माझ्यावर बोली लागली. मला आनंद तर होतोय, असं कार्तिक म्हणाला.
Kartik Sharma CSKs New Young Sensation : आयपीएल 2026 च्या लिलावामध्ये अनकॅप्ड भारतीय खेळाडूंवर पैशांचा पाऊस पडला. खासकरून चेन्नई सुपर किंग्जने आपल्या नावापुढचा महाताऱ्यांची टीम हा टॅग पुसून टाकला अन् तरुण खेळाडूंवर मोठी बोली लावली. चेन्नई सुपर किंग्जने दोन अशा खेळाडूंना कोट्यावधी रुपयात घेतलंय, ज्यांना अजून टीम इंडियाची कॅप देखील मिळाली आहे. प्रशांत वीर आणि कार्तिक शर्मा हे आयपीएल इतिहासातील सगळ्यात महागडे अनकॅप्ड खेळाडू ठरले. या दोघांना चेन्नई सुपर किंग्जने प्रत्येकी 14.20 कोटींना संघात घेतलं. पण एकीकडे लिलाव लागत असताना दुसरीकडे कार्तिक शर्मा ढसाढसा रडत होता.
जेव्हा बिडिंग सुरू झाली तेव्हा मला...
14.20 कोटींची बोली लागल्यानंतर कार्तिकला अश्रू अनावर झाले. आज पहिल्यांदा माझ्यावर बोली लागली. मला आनंद तर होतोय. मला इतका आनंद झाला की, मला रडायला आलं. जेव्हा बिडिंग सुरू झाली तेव्हा मला भीती वाटत होती की, मी अनसोल्ड तर जाणार नाही ना... पण बिडिंग सुरू झाली अन् मला रडायला आलं. सगळे नाचत होते पण माझ्या डोळ्यातून पाणी थांबत नव्हतं, असं कार्तिक शर्मा म्हणाला.
advertisement
A priceless moment for #KartikSharma!
The joint-most expensive uncapped player in the #TATAIPL reacts after joining #CSK. #TATAIPLAuction 2026 pic.twitter.com/cJ4tkn9jIz
— Star Sports (@StarSportsIndia) December 16, 2025
मला आज इतका आनंद होतोय की...
advertisement
माही भाईसोबत मी पहिल्यांदा खेळणार आहे. महेंद्रसिंग धोनीसोबत खेळणं माझ्यासाठी अभिमानाचा क्षण आहे. आमच्या कुटूंबातून पहिल्यांदा असं कुणीतरी मोठ्या स्टेजवर खेळणार आहे. त्यामुळे घरातले सगळेच आनंदी आहेत. मला आज इतका आनंद होतोय की, काही शब्दच नाहीयेत बोलायला, असंही कार्तिक शर्मा म्हणाला.
advertisement
मालती चहरची कार्तिकसाठी पोस्ट
दरम्यान, माझ्या या प्रवासात माझे आई-वडील, चहार सर, तिवारी सर यांच्यामुळे इथपर्यंत पोहोचलोय. त्यामुळे मला आज खूप आनंद झालाय, असं कार्तिक शर्माने म्हटलं आहे. कार्तिक शर्मा हा चहर क्रिकेट अकादमीमध्ये तयार झालेला खेळाडू आहे. त्यामुळे दीपक चहरची बहिण आणि अभिनेत्री मालती चहरने देखील त्याच्यासाठी पोस्ट केली.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
December 17, 2025 8:01 AM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
Kartik Sharma : चेन्नईने 14.20 कोटींची बोली लावली अन् कार्तिक शर्मा ढसाढसा रडला, मालती चहरशी खास कनेक्शन!










