SRHच्या कामगिरीने काव्या नाराज, अश्रू अनावर; सामना संपण्याआधीच स्टेडियम सोडलं, VIDEO VIRAL
- Published by:Suraj Yadav
Last Updated:
केकेआरची ६ षटके झाली तेव्हाच नाराज झालेली काव्या मारन स्टेडियममधून बाहेर निघाली होती. काही वेळाने ती पुन्हा स्टेडियममध्ये आली. त्यावेळी तिला अश्रू अनावर झाले होते.
चेन्नई : आयपीएल 2024 सनरायजर्स हैदराबादला हरवून कोलकाता नाइट रायडर्सने आयपीएल विजेतेपद पटकावलं. केकेआरने तिसऱ्यांदा आयपीएलवर नाव कोरलं. यासह हैदराबादचं दुसऱ्यांदा विजेतेपद पटकावण्याचं स्वप्न भंगलं. केकेआरने फायनलला हैदराबादला ८ गडी राखून नमवलं. या सामन्यावेळी हैदराबादच्या संघाची मालकीन काव्या मारन स्टेडियममध्ये होती. पण सामन्यात सुरुवातीपासूनच सनरायजर्स हैदराबादची कामगिरी निराशाजनक अशी राहिली. हैदराबादचे फलंदाज स्वस्तात बाद झाले. त्यानंतर गोलंदाजही विशेष कामगिरी करू शकले नाही. केकेआरची ६ षटके झाली तेव्हाच नाराज झालेली काव्या मारन स्टेडियममधून बाहेर निघाली होती. काही वेळाने ती पुन्हा स्टेडियममध्ये आली. त्यावेळी तिला अश्रू अनावर झाले होते.
सनरायजर्स हैदराबादने प्रथम फलंदाजी करताना फक्त ११३ धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल मैदानात उतरलेल्या केकेआरने हे आव्हान दोन गड्यांच्या मोबदल्यात 10.3 षटकात पूर्ण केलं. हैदराबादचे फक्त ४ फलंदाज दुहेरी आकडा गाठू शकले. कर्णधार पॅट कमिन्सने सर्वाधिक २४ धावा केल्या. काव्या मारनचा ७ सेकंदाचा एक व्हिडीओ व्हायरल होत असून त्यात ती सर्वांना बाय बाय करत बाहेर जाताना दिसते. काव्या मारन स्टेडियममधून बाहेर जात होती तेव्हा केकेआरच्या १ बाद ६६ धावा झाल्या होत्या. त्यावेळी व्यंकटेश अय्यर आणि रहमनुल्लाह गुरबार खेळपट्टीवर होते.
advertisement
Disappointed to see SRH owner Kavya Maran leave the stadium within 6 overs of the final. Leadership is about standing by your team through thick and thin, not just in victory. This sends a terrible message to the players and fans
#KKRvsSRH #kavyamaran pic.twitter.com/T3TC4W9L5s— Bobby (@CinemaSixers) May 26, 2024
advertisement
सनरायजर्सचा कर्णधार पॅट कमिन्सने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. पण कमिन्सच्या या निर्णयाचा फटका सनरायजर्स हैदराबादला बसला. चेपॉकमध्ये एक दिवस आधी पाऊस झाला होता. त्यामुळे केकेआरच्या वेगवान गोलंदाजांचे चेंडू स्विंग होत होते. केकेआरच्या वेगवान माऱ्यासमोर सनरायजर्स हैदराबादची फलंदाजी गडगडली. त्यांचा संघ फक्त ११३ धावाच करू शकला.
Kavya Maran was hiding her tears.
- She still appreciated KKR. pic.twitter.com/KJ88qHmIg6
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) May 26, 2024
advertisement
हैदराबादच्या फलंदाजांनी हाराकिरी केल्यानंतर गोलंदाजांनीही मोठी निराशा केली. पॅट कमिन्सने सुरुवातीला विकेट घेत आशा निर्माण केल्या होत्या. पण त्यानंतर हैदराबादला केकेआरचे फलंदाज बाद करता आले नाहीत. पॅट कमिन्सशिवाय शहबाज अहमदने एक विकेट घेतली.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
May 27, 2024 8:19 AM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
SRHच्या कामगिरीने काव्या नाराज, अश्रू अनावर; सामना संपण्याआधीच स्टेडियम सोडलं, VIDEO VIRAL