लॉर्डसवर कॉमेंट्री करताना खेळाडूला लॉटरी, काव्या मारनने दिली मोठी जबाबदारी
- Published by:Prashant Gomane
Last Updated:
लॉर्डसच्या मैदानावर काँमेंट्री करणाऱ्या एका दिग्गज क्रिकेटपटूला लॉटरी लागली आहे. या दिग्गजाच्या खांद्यावर सनरायझर्स हैदराबादची मालकीण काव्या मारणने मोठी जबाबदारी सोपवली आहे.
Kavya Maran New Bowling Coach :क्रिकेटची पंढरी समजल्या जाणाऱ्या लॉर्डसच्या मैदानावर सध्या भारत आणि इंग्लंडच्या यांच्यात अटीतटीचा सामना सूरू आहे. या सामन्या दरम्यान लॉर्डसच्या मैदानावर काँमेंट्री करणाऱ्या एका दिग्गज क्रिकेटपटूला लॉटरी लागली आहे. या दिग्गजाच्या खांद्यावर सनरायझर्स हैदराबादची मालकीण काव्या मारणने मोठी जबाबदारी सोपवली आहे. त्यामुळे हा दिग्गज आता सनरायझर्स हैदराबादचा नवा बॉलिंग कोच बनणार आहे. दरम्यान हा दिग्गज कोण आहे? हे जाणून घेऊयात.
सनरायझर्स हैदराबादची मालकीण काव्या मारणने आयपीएलच्या पुढच्या हंगामासाठी नवीन बॉलिंग कोचची घोषणा केली आहे. आयपीएलच्या 2026 च्या हंगामासाठी काव्या मारणने 35 वर्षीय वेगवान गोलंदाज वरूण आरोनला सनरायझर्स हैदराबादचा बॉलिंग कोच म्हणून नियुक्ती केली आहे. त्यामुळे आता वरूण आरोन पुढच्या हंगामात जेम्स फ्रॅकलीनची जागा घेईल.
A fiery addition to our coaching staff! Welcome Varun Aaron as our new bowling coach 🔥🧡#PlayWithFire pic.twitter.com/qeg1bWntC5
— SunRisers Hyderabad (@SunRisers) July 14, 2025
advertisement
हैदराबादने आयपीएल 2025 च्या हंगामासाठी जेम्स फ्रॅकलीनला डेल स्टेनच्या जागी बॉलिंग कोच बनवले होते.पण आता एकच सीझननंतर ते बाहेर झाले आहेत. आता त्यांचा जागा वरूण आरोन घेणार आहे. वरूण आरोनने भारतासाठी 9 टेस्ट आणि 9 वनडे सामने खेळले आहेत. तसेच त्याने त्याच्या क्रिकेट करिअरमध्ये फर्स्ट क्लास क्रिकेट, लिस्ट ए आणि टी20 मिळुन त्याने 407 विकेट घेतल्या आहेत. तर न्यूझीलंडचा माजी खेळाडू जेम्स फ्रॅकलीने आपल्या क्रिकेटींग करिअरमध्ये 820 विकेट घेतले आहेत.
advertisement
दरम्यान यंदाच्या हंगामात हैदराबाद काही खास कामगिरी करू शकली नव्हती. हैदराबादने लिलावात प्रचंड पैसा ओतून अनेक प्रतिभावंत खेळाडूंना संघात घेतलं होतं. पण हे खेळाडू फारशी चांगली कामगिरी करू शकले नाही. आणि हा संघ प्लेऑफमध्येही पोहोचू शकला नाही. हैदराबाद संघ या हंगामात पॉइंट्स टेबलमध्ये सहाव्या स्थानावर राहिला होता.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
July 14, 2025 8:40 PM IST