मुलींसोबतचे अश्लिल Audio लिक, करोडोंची टॅक्सचोरी, कांड करून वर्ल्ड कप विजेता क्रिकेटर गायब!
- Published by:Shreyas Deshpande
Last Updated:
वर्ल्ड कप विजेता दिग्गज खेळाडू नंतर टीमचा प्रशिक्षकही झाला, पण अश्लिल व्हिडिओ लिक झाल्यामुळे तसंच कोट्यवधींच्या टॅक्स चोरीचा आरोप झाल्यानंतर हा क्रिकेटपटू अचानक गायब झाला आहे.
मुंबई : वर्ल्ड कप विजेता दिग्गज खेळाडू नंतर टीमचा प्रशिक्षकही झाला, पण अश्लिल व्हिडिओ लिक झाल्यामुळे तसंच कोट्यवधींच्या टॅक्स चोरीचा आरोप झाल्यानंतर हा क्रिकेटपटू अचानक गायब झाला आहे. आपण बोलत आहोत इंग्लंडला पहिला टी-20 वर्ल्ड कप जिंकवून देणारा कर्णधार पॉल कॉलिंगवूडबद्दल. कॉलिंगवूडने क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर कोचिंग स्टाफमध्येही काम केलं, पण तो अचानक गायब झाला.
49 वर्षीय कॉलिंगवूडने या वर्षी 22 मे पासून राष्ट्रीय कोचिंग सेटअपमध्ये भाग घेतलेला नाही. 'वैयक्तिक कारण सांगून त्याने नॉटिंगहॅममध्ये झिम्बाब्वेविरुद्धच्या एकमेव टेस्ट मॅचमधून माघार घेतली. आता, डेली मेलच्या वृत्तानुसार, ऑस्ट्रेलियातील आगामी अॅशेस मालिकेसाठी त्याला कोचिंग टीममध्ये समाविष्ट केले जाणार नाही. कॉलिंगवूडने टीम सोडल्यापासून जवळजवळ एक वर्ष झाले आहे आणि त्याच्या अनुपस्थितीबद्दल कोणतेही अधिकृत स्पष्टीकरण देण्यात आलेले नाही.
advertisement
सेक्स स्कँडल आणि लीक झालेली व्हॉइस नोट
एप्रिल 2023 पासून कॉलिंगवूडवर स्कँडलचे आरोप व्हायला लागले. कॉलिंगवूडचा सहकारी ग्रॅमी स्वानने रिग बझ या पॉडकास्टवर क्रिकेटपटूंमध्ये फिरणाऱ्या एका ऑडिओ रेकॉर्डिंगचा उल्लेख केला. लीक झालेल्या व्हॉइस नोट्समध्ये कॉलिंगवूड अनेक महिलांसोबत दोन तासांच्या लैंगिक संबंधात सहभागी असल्याचं दाखवण्यात आलं आहे, पण याची वेळ आणि ठिकाण अस्पष्ट आहे. स्वानने या रेकॉर्डिंगचा उल्लेख प्युअर कॉलिंगवूड असा केला आणि तो 'ग्रेट टुरिस्ट' असल्याचा पुरावा दिला.
advertisement
इंग्लंडचा ऑलराऊंडर असलेल्या कॉलिंगवूडने क्रिकेट वर्तुळात त्याच्या मैदानाबाहेरील कृत्यांसाठी वारंवार माध्यमांचे लक्ष वेधले. 2007 मध्ये दक्षिण आफ्रिकेतल्या टी-20 वर्ल्ड कपवेळी कॉलिंगवूडला केपटाऊनमधील मॅव्हेरिक्स या स्ट्रिप क्लबमध्ये पाहिलं गेलं होतं. या घटनेनंतर इंग्लंड क्रिकेट बोर्डाने त्याला 1 हजार पाऊंडचा दंड ठोठावला. 2022 साली ऍशेसमध्ये इंग्लंडचा पराभव झाला, त्यानंतर कॉलिंगवूडची इंग्लंडचा अंतरिम मुख्य प्रशिक्षक म्हणून नियुक्ती केली गेली, यानंतर कॉलिंगवूडचे बार्बाडोसमधील समुद्रकिनाऱ्यावर एका महिलेचं चुंबन घेतानाचे फोटो समोर आले. यानंतर काही दिवसांनी इंग्लंडने वेस्ट इंडिजविरुद्धची शेवटची टेस्ट 10 विकेटने गमावली.
advertisement
कॉलिंगवूड कायदेशीर अडचणीत
कॉलिंगवूड हा कायदेशीर अडचणीतही सापडला आहे. न्यायालयाने कॉलिंगवूडला 196,000 पाऊंड (अंदाजे 2 कोटी रुपये) टॅक्स बिल भरण्याचे आदेश दिले आहेत. स्पॉन्सरशीप करारांमधून मिळणारे उत्पन्न कमी दाखवण्यासाठी आणि कर दायित्व कमी करण्यासाठी कॉलिंगवूडने पर्सनल सर्व्हिस कंपनी 'पीडीसी राईट्स'चा वापर केला, त्यामुळे त्याच्याकडून हा दंड आकारण्यात आला आहे.
याआधी 2009 साली कॉलिंगवूडवरचा आधीचा एक खटला रद्द करण्यात आला होता. एचएमआरसीने पुन्हा एकदा तपास सुरू केला, आणि स्लेझेंजर आणि क्लाइड्सडेल बँक यांच्यासारख्या ब्रँडकडून मिळणाऱ्या देयकांवर कॉर्पोरेट उत्पन्न नव्हे, तर स्वयंरोजगार उत्पन्न म्हणून कर आकारला जावा, असा निर्णय दिला. याप्रकरणी कॉलिंगवूडने अलीकडेच खटला गमावला, त्यामुळे त्याला संपूर्ण रक्कम भरावी लागणार आहे. इंग्लंडचा झिम्बाब्वेविरुद्धच्या सामन्यातून माघार घेतल्यानंतर कॉलिंगवूड करविषयक समस्या सोडवण्यासाठी लंडनमध्येच होता, असं सांगितलं जात आहे.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
October 20, 2025 6:28 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
मुलींसोबतचे अश्लिल Audio लिक, करोडोंची टॅक्सचोरी, कांड करून वर्ल्ड कप विजेता क्रिकेटर गायब!