MI vs DC : दिल्लीला मोठा धक्का! मुंबई विरूद्ध सामन्यातून स्टार खेळाडू बाहेर
- Published by:Prashant Gomane
Last Updated:
दिल्ली कॅपिटल्सने टॉस जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे मुंबई इंडियन्स प्रथम फलंदाजी करताना दिसणार आहे.दरम्यान या सामन्याच्या सूरूवातीलाच दिल्लीला मोठा धक्का बसला आहे.
MI vs DC : मुंबईच्या वानखेडेच्या मैदानावर आज मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स भिडणार आहे.या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने टॉस जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे मुंबई इंडियन्स प्रथम फलंदाजी करताना दिसणार आहे.दरम्यान या सामन्याच्या सूरूवातीलाच दिल्लीला मोठा धक्का बसला आहे.
टॉस दरम्यान फाफ डुप्लेसिस मैदानावर येताना दिसला. टॉसला देखील तोच सामोरे गेला, यावेळी त्याने टॉस जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे मुंबई इंडियन्स प्रथम फलंदाजी करताना दिसणार आहे.
टॉस दरम्यान ड्युप्लेसिसने अक्षर पटेलच्या अनुपस्थिति बाबत माहिती दिली आहे. अक्षर पटेल गेल्या दोन दिवसांपासून खूप आजारी आहे.आज आम्ही त्याला मिस करू असे ड्युप्लेसिस म्हणाला.त्यामुळे आजच्या सामन्यात अक्षर पटेल खेळताना दिसणार नाही आहे. मुंबईला याचा मोठा फायदा मिळणार आहे.
advertisement
ड्युप्लेसिस पुढे म्हणाले, आज एका चांगल्या संघासोबत खेळत आहोत, आम्ही त्यासाठी तयार आहोत. गेल्या ५-६ सामन्यांमध्ये आम्ही सर्वोत्तम कामगिरी केली नाही. दररोज एक नवीन संधी असते. थोडीशी कोरडी वाटते.
आम्हालाही गोलंदाजी करायला आवडली असती, पण काही हरकत नाही. आतापासून प्रत्येक सामना महत्त्वाचा आहे, आम्हाला आमचे सर्वोत्तम क्रिकेट खेळायचे आहे. मुले खूप उत्साहित आहेत. (सर्वोत्तम सामना अजून बाकी आहे का?) हो, नक्कीच, मला वाटत नाही की आमचा पूर्ण सामना झाला आहे. त्यांनी (प्रेक्षकांनी) उत्तम कामगिरी केली आहे. आम्ही चांगल्या स्थितीत नसतानाही त्यांनी आम्हाला पाठिंबा दिला आहे. प्लेइंग इलेव्हनमध्ये एक बदल झाला आहे, मिच परत येतो, बॉशला बाहेर बसवलं आहे,असे हार्दिक पंड्या टॉस दरम्यान म्हणाला आहे.
advertisement
दिल्ली कॅपिटल्स (प्लेइंग इलेव्हन): फाफ डू प्लेसिस (क), अभिषेक पोरेल (डब्ल्यू), समीर रिझवी, आशुतोष शर्मा, ट्रिस्टन स्टब्स, दुष्मंथा चमीरा, विपराज निगम, माधव तिवारी, कुलदीप यादव, मुस्तफिजुर रहमान, मुकेश कुमार
मुंबई इंडियन्स (प्लेइंग इलेव्हन): रायन रिकेल्टन (w), रोहित शर्मा, विल जॅक्स, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, हार्दिक पांड्या (क), नमन धीर, मिचेल सँटनर, दीपक चहर, ट्रेंट बोल्ट, जसप्रीत बुमराह
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
May 21, 2025 7:12 PM IST


