MI vs DC : सामन्याआधीच मुंबईचं टेन्शन वाढलं, दिल्लीचा 'हा' खेळाडू गेम करणार,आकडे पाहून चक्कर येईल
- Published by:Prashant Gomane
Last Updated:
दिल्लीचा एक खेळाडू मुंबईचा गेम करू शकतो. कारण या खेळाडूचे वानखेडेच्या मैदानावर आकडे पाहून मुंबई संघाला चक्कर येणार आहे.त्यामुळे हा खेळाडू कोण आहे?हे जाणून घेऊयात.
MI vs DC : मुंबईच्या वानखेडेच्या मैदानावर आज मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स भिडणार आहे. या सामन्यावर पावासाचे सावट आहे.त्यामुळे हा सामना होईल की नाही माहित नाही. पण मुंबईच टेन्शन मात्र वाढलं आहे.कारण दिल्लीचा एक खेळाडू मुंबईचा गेम करू शकतो. कारण या खेळाडूचे वानखेडेच्या मैदानावर आकडे पाहून मुंबई संघाला चक्कर येणार आहे.त्यामुळे हा खेळाडू कोण आहे?हे जाणून घेऊयात.
हा खेळाडू दुसरा तिसरा कुणी नसून के एल राहुल आहे. के एल राहुल यंदाच्या हंगामात चांगल्या फॉर्ममध्ये आहे. त्याने यंदाच्या हंगामात 11 सामन्यात 493 धावा केल्या आहेत. त्याची सरासरी 61.62 आहे. ही झाली या आयपीएलची आकडेवारी आहे. आता वानखेडेच्या मैदानावर राहुलची बॅटीने काय कमाल केली आहे, ती पाहूयात.
advertisement
के एल राहुलने मुंबई इंडियन्स विरूद्ध 965 धावा ठोकल्या आहेत. यावेळी त्याची सरासरी 74.35 होती.याचाच अर्थ प्रतिस्पर्धी संघाविरूद्ध या सर्वाधिक धावा आणि सरासरी आहे. विशेष म्हणजे वानखेडेच्या मैदानावर त्याने 400 धावा केल्या आहेत. त्यामुळे या मैदानावर त्याचा सरासरी 100 आहे. राहुलची हीच आकडेवारी मुंबई इंडियन्सला घाम फोडू शकते.त्यामुळे मुंबईचं टेन्शन वाढलं आहे.
advertisement
हवामानाचा अंदाज काय?
Weather.com च्या अंदाजानुसार, आज मुंबईत वादळी वाऱ्यांसह पावसाची (Mumbai Rain) दाट शक्यता आहे. यामुळे टॉस आणि सामन्याची सुरुवात देखील लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. हवामानाचा अंदाज इतका खराब आहे की, आयपीएल सामन्यांसाठी वाढवण्यात आलेला अतिरिक्त वेळही निरुपयोगी ठरू शकतो.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
May 21, 2025 5:55 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
MI vs DC : सामन्याआधीच मुंबईचं टेन्शन वाढलं, दिल्लीचा 'हा' खेळाडू गेम करणार,आकडे पाहून चक्कर येईल