MI vs DC : असं करू नको...अपील करणाऱ्या तिलकलाच रोखलं, हार्दिक पांड्याने दाखवला मनाचा मोठेपणा
- Published by:Prashant Gomane
Last Updated:
दिल्ली कॅपिटल्ससमोर 181 धावांचे आव्हान आहे.या आव्हानाचा पाठलाग करताना दिल्लीचा डाव चांगलाच गडगडला आहे. या सामन्यात हार्दिकने फुकटातली विकेट मिळाली असती पण त्याने मनाचा मोठेपणा दाखवत ती विकेट नाकारली आहे.
MI vs DC : वानखेडेच्या मैदानावर रंगलेल्या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना 180 धावा ठोकल्या आहेत. त्यामुळे दिल्ली कॅपिटल्ससमोर 181 धावांचे आव्हान आहे.या आव्हानाचा पाठलाग करताना दिल्लीचा डाव चांगलाच गडगडला आहे. या सामन्यात हार्दिकने फुकटातली विकेट मिळाली असती पण त्याने मनाचा मोठेपणा दाखवत ती विकेट नाकारली आहे.
खरं तर स्टब्सची विकेट पडताच आशुतोष शर्मा मैदानावर आला होता.यावेळी स्टब्सने मैदानावर येताच बुटाचे लेस लावले आणि त्यानंतर ग्लोव्हज देखील घातले. आशुतोष शर्मा खेळण्यास उशीर करत असल्याचे पाहून मुंबई इंडियन्सच्या खेळाडूंनी अपील करण्याचा निर्णय घेतला आहे.
त्याचं झालं असं की आशुतोष शर्मा फलंदाजीस उशीर करत असल्याचे पाहून तिलक वर्माने अपील करू शकतो,अपील केलं तर आऊट देतील,असे पांड्याला सांगितले. आणि तिलक वर्माने अपील देखील केले. हार्दिकने ही गोष्ट ऐकली पण त्याने त्यास नकार दिला. त्यानंतर दोन्ही अंपायरने एकमेकांशी चर्चा केली. पण या अपीलचा काहीच निकाल लागला नाही.
advertisement
दरम्यान या संदर्भात आंतरराष्ट्रीय क्रिकेट आणि आयपीएलमध्ये नेमका नियम काय आहे? हे जाणून घेऊयात.
आयसीसी नियम (आंतरराष्ट्रीय क्रिकेट): आयसीसीच्या खेळाच्या नियमांनुसार (Playing Conditions), कसोटी आणि एकदिवसीय सामन्यांमध्ये फलंदाजाला बाद झालेल्या खेळाडूच्या जागी 3 मिनिटांच्या आत मैदानात येऊन खेळण्यासाठी तयार व्हावे लागते. टी-20 सामन्यांमध्ये ही मर्यादा 90 सेकंद (1.5 मिनिटे) आहे.
आयपीएल नियम: आयपीएल 2025 मध्येही टी-20 स्वरूपामुळे 90 सेकंदांची मर्यादा लागू आहे. याचा अर्थ, खेळाडू बाद झाल्यावर पुढील फलंदाजाला 90 सेकंदांच्या आत मैदानात येऊन खेळण्यासाठी सज्ज व्हावे लागते.
advertisement
उशीर झाल्यास दंड: जर फलंदाज वेळेत मैदानात येण्यास अपयशी ठरला, तर पंच (अंपायर) त्याला टाइम्ड आऊट घोषित करू शकतात. हा नियम आयसीसीच्या नियमावलीतील कलम 40.1 अंतर्गत येतो.
टाइम्ड आऊट: जर फलंदाज 90 सेकंद (टी-20 मध्ये) किंवा 3 मिनिटे (कसोटी/एकदिवसीय) येथे तयार नसेल, तर पंच प्रतिस्पर्धी संघाच्या कर्णधाराला विचारू शकतात की त्यांना त्या फलंदाजाला टाइम्ड आऊट द्यायचे आहे का. जर कर्णधाराने होय म्हटले, तर फलंदाजाला बाद घोषित केले जाते.
advertisement
उशीराची कारणे आणि अपवाद: जर फलंदाजाला दुखापत, उपकरणांच्या समस्येमुळे (उदा., ग्लोव्हज, पॅड्स), किंवा अन्य वैध कारणामुळे उशीर झाला, तर पंच आणि प्रतिस्पर्धी कर्णधार यावर विचार करू शकतात आणि दंड टाळला जाऊ शकतो.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
May 21, 2025 11:14 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
MI vs DC : असं करू नको...अपील करणाऱ्या तिलकलाच रोखलं, हार्दिक पांड्याने दाखवला मनाचा मोठेपणा