MI vs GT : बापाची आयपीएलमधून एक्झिट, पोरांच्या डोळ्यात पाणी; शुभमनची बहीणही ढसाढसा रडली, पाहा Video
- Published by:Saurabh Talekar
Last Updated:
Ashish Nehra kids heartbroken After MI vs GT : गुजरात टायटन्सचे कोच अशिष नेहराच्या मुलांना गुजरातच्या पराभवानंतर दु:ख अनावर झालं. त्यानंतर त्यांना अश्रू अनावर झाले. त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
Shubhman Gill Sister crying Video : मुलानपूर येथे झालेल्या रोमांचक आयपीएल (IPL 2025) च्या एलिमिनेटर सामन्यात हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखालील मुंबई इंडियन्सने शुभमन गिलच्या गुजरात टायटन्सचा 20 धावांनी पराभव करत क्वालिफायर 2 मध्ये दिमाखात प्रवेश केला. या विजयाने मुंबई इंडियन्सची अंतिम फेरी गाठण्याची आशा कायम राहिली आहे. या पराभवानंतर गुजरात टायटन्सच्या खेळाडूंसह सपोर्ट स्टाफ आणि त्यांच्या कुटुंबीयांमध्येही तीव्र भावना दिसून आल्या. मैदानातून समोर आलेल्या दृश्यांनी चाहत्यांना देखील हळहळ वाटली. सामन्यानंतर काही भावूक झालेले चेहरे दिसून आले, यामध्ये शुभमन गिलची बहिण देखील भावनिक झाली होती.
आशिष नेहराचा मुलगा ढसाढसा रडला
गुजरात टायटन्सचे मुख्य प्रशिक्षक आशिष नेहरा यांचा मुलगा, जो नेहमीच संघाला पाठिंबा देताना दिसतो, तो संघाच्या या पराभवानंतर अत्यंत भावूक झाला. सामना संपल्यानंतर त्याला अक्षरशः रडू कोसळले आणि त्याचे हृदय तुटल्याचे स्पष्टपणे दिसून येत होते. त्याला इतर लोकांनी समजावण्याचा आणि सावरण्याचा प्रयत्न केला. वडिलांच्या टीमने यंदाच्या आयपीएलमधून एक्झिट घेतल्यानंतर आता कुटूंब भावूक झाल्याचं दिसून आलंय.
advertisement
@mipaltan seal the #Eliminator with a collective team performance
Scorecard https://t.co/R4RTzjQNeP#TATAIPL | #GTvMI | #TheLastMile pic.twitter.com/cJzBLVs8uM
— IndianPremierLeague (@IPL) May 30, 2025
शुभमन गिलच्या बहिणीच्या डोळ्यात पाणी
advertisement
याचवेळी, गुजरात टायटन्सचा कर्णधार शुभमन गिलची बहीण शहनील गिल देखील प्रचंड निराश झाली होती. तिच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते आणि ती रडताना कॅमेऱ्यात कैद झाली. गुजरातच्या पराभवाने तिला खूप दुःख झालं होतं आणि तिलाही इतरांकडून सांत्वन दिलं जात होतं.
दरम्यान, मुंबई इंडियन्सने गुजरात टायटन्सला स्पर्धेतून बाहेर काढले असून, आता क्वालिफायर 2 मध्ये त्यांचा सामना पंजाब किंग्जशी होणार आहे. क्वालिफायर 2 मधील विजेता संघ अंतिम सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळूरुशी (RCB) भिडेल. रोहित शर्माला त्याच्या आक्रमक 81 धावांच्या खेळीसाठी 'प्लेअर ऑफ द मॅच' पुरस्काराने गौरवण्यात आले.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
May 31, 2025 1:32 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
MI vs GT : बापाची आयपीएलमधून एक्झिट, पोरांच्या डोळ्यात पाणी; शुभमनची बहीणही ढसाढसा रडली, पाहा Video