MI vs GT Eliminator : एलिमिनेटर सामन्याआधी गिलचं टेन्शन वाढलं, 538 धावा करणारा खेळाडू स्पर्धेतून बाहेर

Last Updated:

चौथ्या स्थानी असलेल्या मुंबई इंडियन्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात एलिमिनेटर सामना रंगणार आहे. या सामन्याआधी मुंबई इंडियन्सला दिलासा मिळाला आहे तर गुजरात टायटन्सला मोठा झटका बसला आहे.

MI vs GT Eliminator
MI vs GT Eliminator
MI vs GT Eliminator : लखनऊ विरूद्धच्या सामन्यात आरसीबीच्या विजयानंतर आता पाटीदारचा संघ टॉप 2 मध्ये पोहोचला आहे.तर दुसऱ्या स्थानी असलेला गुजरात संघ तिसऱ्या स्थानी आला आहे.त्यामुळे आता चौथ्या स्थानी असलेल्या मुंबई इंडियन्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात एलिमिनेटर सामना रंगणार आहे. या सामन्याआधी मुंबई इंडियन्सला दिलासा मिळाला आहे तर गुजरात टायटन्सला मोठा झटका बसला आहे.
खरं तर प्लेऑफ सामन्यापूर्वी मुंबई इंडियन्सचा रायन रिकेल्टन,कॉर्बिन बॉश आणि विल जॅक्स हे खेळाडू राष्ट्रीय कर्तव्यासाठी मायदेशी परतले आहेत. तर जॉनी बेअरस्ट्रो मुंबईच्या ताफ्यात आला आहे.त्यामुळे मुंबईसाठी ही दिलासादायक बाब आहे.मुंबईसह आता गुजरातलाही मोठा धक्का बसला आहे. कारण या संघाचा खेळाडू जोस बटलर देखील वेस्ट इंडिजविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी इंग्लंडला परतला आहे.
advertisement
आयपीएल 2025 मध्ये ठोकल्या 538 धावा
जोस बटलर गुजरातसाठी विकेटकीपर-फलंदाज म्हणून भूमिका बजावत होता आणि तो यष्टीच्या मागे आणि पुढे उत्कृष्ट कामगिरी करत होता. जोस बटलरच्या फलंदाजीने गुजरातला प्लेऑफमध्ये नेण्यातही महत्त्वाची भूमिका बजावली, त्याने 14 सामन्यांमध्ये 163.03 च्या स्ट्राईक रेट आणि 59.78 च्या सरासरीने 538 धावा केल्या. जोस बटलरने आयपीएलच्या या हंगामात गुजरातसाठी तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी केली आणि धावा करण्यात सातत्यपूर्ण कामगिरी केली. बटलरला संघातून वगळणे हा खरोखरच कर्णधार गिलसाठी मोठा धक्का आहे.
advertisement
तिसऱ्या क्रमांकावर कोण फलंदाजी करणार?
बटलरला संघातून बाहेर गेल्यानंतर मुंबईविरुद्ध गुजरातमध्ये तिसऱ्या क्रमांकावर कोण फलंदाजी करणार हा मोठा प्रश्न आहे. तथापि, गुजरातने आधीच जोस बटलरच्या जागी श्रीलंकेचा यष्टीरक्षक-फलंदाज कुसल मेंडिसला करारबद्ध केले होते. गुजरातने मेंडिसला ७५ लाख रुपयांना करारबद्ध केले होते आणि त्याची जागा २६ मे पासून प्रभावी झाली कारण बटलरने २५ मे रोजी सीएसकेविरुद्ध हंगामातील शेवटचा सामना खेळला होता.
advertisement
दरम्यान शुभमन गिलच्या नेतृत्वाखालील गुजरात टायटन्सचा सामना आयपीएल २०२५ च्या एलिमिनेटर सामन्यात हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखालील मुंबई इंडियन्सशी होईल. हा सामना हरणारा संघ अंतिम फेरीच्या शर्यतीतून बाहेर पडेल. गुजरात आणि मुंबई दोघांसाठीही हा सामना अंतिम सामन्यापेक्षा कमी नसेल.
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
MI vs GT Eliminator : एलिमिनेटर सामन्याआधी गिलचं टेन्शन वाढलं, 538 धावा करणारा खेळाडू स्पर्धेतून बाहेर
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement