Sachin Tendulkar : 'मी सचिन तेंडूलकरपेक्षा 5000 धावा जास्त केल्या असत्या...', ऑस्ट्रेलियाच्या दिग्गजाचा दावा!
- Published by:Saurabh Talekar
Last Updated:
Michael Hussey On Sachin Tendulkar : ऑस्ट्रेलियाचा माजी फलंदाज मायकेल हसी विनोदाने म्हणाला की, जर तो लहानपणापासून राष्ट्रीय संघासाठी खेळला असता तर त्याने सचिन तेंडुलकरपेक्षा 5000 जास्त धावा केल्या असत्या
Michael Hussey On Sachin Tendulkar : सचिन रमेश तेंडूलकर, म्हणजेच क्रिकेटचा देव... सचिन तेंडूलकरने क्रिकेटला नव्या उंचीवर पोहोचवलं. पाकिस्तान असो वा ऑस्ट्रेलिया, सचिनने कुणालाही सुट्टी दिली नाही. वयाच्या 16 व्या वर्षापासून सचिन खोऱ्याने धावा काढतोय. अशातच आता ऑस्ट्रेलियाचा माजी खेळाडू मायकेल हसी याने मोठं वक्तव्य केलं आहे. मायकेल हसी हा असं काही म्हटला की, त्याला स्वत:ला देखील हसू आवरलं नाही.
काय म्हणाला मायकेल हसी?
ऑस्ट्रेलियाचा माजी फलंदाज मायकेल हसी विनोदाने म्हणाला की, जर तो लहानपणापासून राष्ट्रीय संघासाठी खेळला असता तर त्याने सचिन तेंडुलकरपेक्षा 5000 जास्त धावा केल्या असत्या. हसीने वयाच्या 28 व्या वर्षी आंतरराष्ट्रीय कारकिर्दीला सुरुवात केली आणि त्याच्या कारकिर्दीत त्याने 49 च्या सरासरीने 12,398 धावा केल्या.
सचिनला 5000 धावांनी मागे टाकलं असतं
advertisement
मायकेल हसी म्हणाला की, जर त्याला आधी संधी मिळाली असती तर तो सचिन तेंडुलकरला 5000 धावांनी मागे टाकू शकला असता. त्याने हे देखील कबूल केलं की त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीला उशिरा सुरुवात झाल्यामुळे त्याच्या धावसंख्येचा आकडा वाढू शकला असता. मायकेल हसीने अलीकडेच 'द ग्रँड क्रिकेटर' यूट्यूब चॅनलवरील मुलाखतीत हे वक्तव्य केलं आहे.
advertisement
सर्व फक्त एक स्वप्न होतं
मी याबद्दल खूप विचार केला आहे. मी कदाचित तेंडुलकरपेक्षा 5000 धावा पुढे असतो. सर्वाधिक धावा, सर्वाधिक शतके, सर्वाधिक विजय, सर्वाधिक अॅशेस विजय आणि कदाचित बहुतेक वर्ल्ड कप देखील, पण नंतर मला सकाळी उठल्यावर कळते की ते सर्व फक्त एक स्वप्न होतं, असं मायकेल हसी हसत हसत म्हणाला.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
October 22, 2025 1:49 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
Sachin Tendulkar : 'मी सचिन तेंडूलकरपेक्षा 5000 धावा जास्त केल्या असत्या...', ऑस्ट्रेलियाच्या दिग्गजाचा दावा!