पाच दिवसाची मेहनत एका चुकीमुळे वाया, सिराजची 90 मिनिटांची झुंज अपयशी, आऊट झाल्यावर डोळे पाणावले, पाहा Video
- Published by:Saurabh Talekar
Last Updated:
Mohammed Siraj emotional Video : लॉर्ड्स क्रिकेट ग्राऊंडवर झालेल्या हृदयद्रावक पराभवानंतर भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज प्रचंड भावूक झाल्याचे पाहायला मिळालं.
Siraj Jadeja shattered After lose Lords : लॉर्ड्स कसोटी सामन्याच्या शेवटच्या दिवशी भारताला विजयासाठी 135 धावांची गरज असताना, रवींद्र जडेजा आणि तळातील फलंदाजांनी कडवी झुंज दिली. मोहम्मद सिराजनेही जडेजाला चांगली साथ देत भारताच्या विजयाच्या आशा पल्लवीत ठेवल्या होत्या. मात्र, शोएब बशीरच्या गोलंदाजीवर तो नशिबाच्या साहाय्याने बाद झाला. बॉल बॅटला लागून हळूवारपणे स्टंप्सवर आदळला आणि बेल्स पडल्या.
सिराजला अश्रू अनावर
इंग्लंडविरुद्ध लॉर्ड्सवर झालेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यातील 22 धावांच्या हृदयद्रावक पराभवानंतर भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज प्रचंड भावूक झाल्याचे पाहायला मिळाले. विजयाच्या अगदी जवळ पोहोचूनही, अखेरचा गडी म्हणून तोच बाद झाल्याने सिराजला अश्रू अनावर झाले. 90 मिनिटं मैदानावर झुंजल्यानंतर पराभव स्विकारणं सिराजला मान्य नव्हचं. 90 मिनिटंच काय तर पाच दिवसाच्या मेहनतीवर विर्जन पडलं होतं. तर दुसरीकडे दिवसभर बॅटिंग करणाऱ्या जडेजाला देखील भावना अनावर झाल्या.
advertisement
How can you not love Test Cricket. 🤍
Hard luck Team India. Well played. #ENGvIND #INDvsENGTest pic.twitter.com/6VI1DVenXh
— • (@_shaddy29) July 14, 2025
इंग्लंडच्या खेळाडूंकडून सांत्वन
लॉर्ड्सवर झालेला पराभव हा क्षण भारतीय चाहत्यांसाठी अत्यंत वेदनादायी होता. सिराजला देखील भावना अनावर झाल्या. सिराज त्याच ठिकाणी मैदानावर गुडघे टेकून बसला आणि त्याचे डोळे पाणावले होते. सिराजला या स्थितीत पाहून इंग्लंडच्या काही खेळाडूंनी मैदानावरच त्याला सांत्वन दिले. हॅरी ब्रूक, जो रूट आणि कर्णधार बेन स्टोक्स हे सिराजकडे धावले आणि त्यांनी त्याला धीर दिला.
advertisement
Mohmmad Siraj is emotional after losing the match. pic.twitter.com/EKXR4TPS1S
— indianTeamCric (@Teamindiacrick) July 14, 2025
जडेजाचा प्रेरणादायी लढा
प्रतिस्पर्धी संघाच्या खेळाडूंनी दाखवलेल्या या खेळीमेळीच्या वृत्तीचे सर्वत्र कौतुक होत आहे. 2005 च्या ॲशेस कसोटीतील ॲन्ड्र्यू फ्लिंटॉफने मायकल कॅस्प्रोविझला दिलेल्या सांत्वनाची आठवण या क्षणाने अनेकांना करून दिली. लॉर्ड्सवरील हा पराभव भारतीय संघासाठी नक्कीच निराशाजनक असला तरी, सिराज आणि रवींद्र जडेजासारख्या खेळाडूंनी अखेरपर्यंत दिलेला लढा प्रेरणादायी ठरला, असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
July 15, 2025 8:43 AM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
पाच दिवसाची मेहनत एका चुकीमुळे वाया, सिराजची 90 मिनिटांची झुंज अपयशी, आऊट झाल्यावर डोळे पाणावले, पाहा Video