VIDEO : हार्दिक पांड्याचा दिलदारपणा! विजयी जल्लोषातही 'ती' गोष्ट विसरला नाही, अख्खं स्टेडिअम बघत राहिलं
- Published by:Prashant Gomane
Last Updated:
वानखेडेवर हा शेवटचा सामना असल्या कारणाने मुंबई हा विजय जल्लोषात साजरा केला. पण या विजयी जल्लोषात हार्दिक पंड्या ती गोष्ट विसरला नाही.त्यामुळे आता मुंबई इंडियन्ससह दिल्ली कॅपिटल्सचे फॅन्स त्याच्यावर प्रचंड खूश झाले आहे.
Mumbai Indians Qualify for Playoff : वानखेडेच्या मैदानावर मुंबई इंडियन्सने बुधवारी दिल्ली कॅपिटल्सला पराभवाची धूळ चारली.या विजयानंतर मुंबई इंडियन्स प्लेऑफमध्ये पोहोचणारी चौथी टीम ठरली आहे.वानखेडेवर हा शेवटचा सामना असल्या कारणाने मुंबई हा विजय जल्लोषात साजरा केला. पण या विजयी जल्लोषात हार्दिक पंड्या ती गोष्ट विसरला नाही.त्यामुळे आता मुंबई इंडियन्ससह दिल्ली कॅपिटल्सचे फॅन्स त्याच्यावर प्रचंड खूश झाले आहे.
खरं तर वानखेडेच्या मैदानावरील विजयानंतर मुंबईने तुफान जल्लोष केला. कारण मुंबई संघ हा प्लेऑफमध्ये पोहोचला आहे. वानखेडेच्या मैदानावर हा शेवटचा सामना असल्या कारणाने मुंबईच्या संघाने मैदानावर एक फेरी मारुन मुंबईच्या चाहत्यांचे आभार मानले होते.
advertisement
दरम्यान ज्यावेळेस मुंबईने हा सामना जिंकला त्यानंतर दोन्ही संघाच्या खेळाडूंनी एकमेकांना हस्तांदोलन केले.यावेळी आजारी असलेला अक्षर पटेल देखील मैदानात आला होता.यावेळी हार्दिक पंड्याने त्याच्याशी हात मिळवणी करून त्याची गळाभेट घेतली व डोक्याच्या बाजूला चुंबन घेतले. विशेष म्हणजे हार्दिक पंड्याने अशी कृती करून अक्षर पटेल आणि दिल्ली कॅपिटल्सच्या प्रती दु:ख व्यक्त केले होते.
advertisement
त्यामुळे मैदानावरील हे दृष्य पाहून मुंबई इंडियन्स आणि दिली कॅपिटल्सचे फॅन्स प्रचंड खूश झाली होती. या संदर्भातला व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
मुंबई विरूद्धच्या सामन्यात अक्षर पटेल खेळू शकला नव्हता.कारण अक्षर पटेल आजारी होता अशी माहिती फॅफ ड्युप्लेसीसने दिली होती.त्यामुळे अक्षर पटेलच्या जागी फॅफ ड्युप्लेसीस संघाचे नेतृत्व केले होते. इतक्या महत्वाच्या सामन्यात अक्षर पटेल खेळला नसल्याने दिल्ली कॅपिटल्सला मोठा झटका बसला होता.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
May 22, 2025 8:22 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
VIDEO : हार्दिक पांड्याचा दिलदारपणा! विजयी जल्लोषातही 'ती' गोष्ट विसरला नाही, अख्खं स्टेडिअम बघत राहिलं