दिग्गज क्रिकेटरच्या आयुष्यात वादळ, दिनेश कार्तिक-मुरली विजयसारखंच घडलं, पत्नीचं टीममधल्या खेळाडूसोबत अफेयर!

Last Updated:

क्रिकेटच्या मैदानातली मैत्री ही आयुष्यभर कायम राहते, याची अनेक उदाहरणं आपण बघितली आहे, पण ही मैत्री पती-पत्नीच्या नात्यामुळे तुटल्याचे प्रकारही समोर आले.

दिग्गज क्रिकेटरच्या आयुष्यात वादळ, दिनेश कार्तिक-मुरली विजयसारखंच घडलं, पत्नीचं टीममधल्या खेळाडूसोबत अफेयर!
दिग्गज क्रिकेटरच्या आयुष्यात वादळ, दिनेश कार्तिक-मुरली विजयसारखंच घडलं, पत्नीचं टीममधल्या खेळाडूसोबत अफेयर!
मुंबई : क्रिकेटच्या मैदानातली मैत्री ही आयुष्यभर कायम राहते, याची अनेक उदाहरणं आपण बघितली आहे, पण ही मैत्री पती-पत्नीच्या नात्यामुळे तुटल्याचे प्रकारही समोर आले. भारताचा माजी क्रिकेटपटू दिनेश कार्तिक आणि मुरली विजय यांच्यातली मैत्रीही अशीच तुटली. दिनेश कार्तिकची आधीची पत्नी निकिता लग्नानंतर मुरली विजयच्या प्रेमात पडली, यानंतर दिनेश कार्तिक आणि निकिता यांचा घटस्फोट झाला आणि आता निकिता आणि मुरली विजय यांनी लग्न केलं आहे. दिनेश कार्तिक आणि मुरली विजय यांच्यासारखाच प्रकार श्रीलंकेच्या दिग्गज क्रिकेटपटूसोबत घडला आहे.
श्रीलंकन क्रिकेटपटू तिलकरत्ने दिलशानचा त्याचाच सहकारी खेळाडू उपुल थरंगाने विश्वासघात केला. ही घटना आहे 2008 सालची, जेव्हा दिलशानला त्याची पत्नी निलंका विथानागे हिचं अफेयर सुरू असल्याचं समजलं, पण पत्नीचं अफेयर कुणासोबत आहे हे समजताच दिलशानच्या पायाखालची जमीन सरकली. आपलाच सहकारी खेळाडू उपुल थरंगासोबत पत्नीचं अफेयर असल्याचं समजल्यानंतर दिलशानला धक्का बसला.
advertisement

मुलांना स्वीकारायला नकार

दिलशानच्या पत्नीचं थरंगासोबत अफेयर सुरू असल्याचं समोर आलं तेव्हा त्या दोघांना एक मुलगाही होता. या संपूर्ण घटनेनंतर दिलशानने निलंका विथानागेसोबत घटस्फोट घ्यायचा निर्णय घेतला, एवढच नाही तर त्याने मुलालाही स्वीकारायला नकार दिला आणि निलंकासोबत त्याला पाठवून दिलं. दिलशानसोबत घटस्फोट घेतल्यानंतर निलंकाने थरंगासोबत लग्न केलं. याच्या काही काळानंतर दिलशाननेही मंजुला थिलिनीसोबत लग्न केलं.
advertisement

कसं सुरू झालं अफेयर?

दिलशानची एक्स वाईफ आणि थरंगाच्या अफेयरमुळे श्रीलंकन क्रिकेटमध्ये भूकंप आला होता. हा प्रकार समोर आला तेव्हा दिलशान श्रीलंकेचा सुपरस्टार होता, तर थरंगा त्याचं करिअर बनवत होता. दिलशान परदेश दौऱ्यावर असल्यामुळे बराच काळ घरापासून लांब राहायचा, तेव्हा थरंगा त्याच्या घरी जायचा, यातून निलंका आणि थरंगा यांच्यातील जवळीक वाढली.
advertisement

2011 वर्ल्ड कप एकत्र खेळले

तिलकरत्ने दिलशान आणि उपुल थरंगा श्रीलंकेच्या उत्कृष्ट खेळाडूंपैकी होते. दोघांच्या आयुष्यात 2008 साली वादळ आलं, पण त्यानंतर दोघांनी त्यांचं क्रिकेट करिअर सोबतच पुढे नेलं. 2011 च्या वर्ल्ड कपमध्ये उपुल थरंगा आणि तिलकरत्ने दिलशान एकत्रच मैदानात उतरले आणि त्यांनी श्रीलंकेसाठी ओपनिंगला बॅटिंगही केली. वैयक्तिक आयुष्यातले वाद विसरून दोन्ही खेळाडू देशासाठी खेळले आणि त्यांनी श्रीलंकेला फायनलमध्ये पोहोचवलं, पण शेवटच्या सामन्यात श्रीलंकेला भारताकडून पराभवाचा सामना करावा लागला.
view comments
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
दिग्गज क्रिकेटरच्या आयुष्यात वादळ, दिनेश कार्तिक-मुरली विजयसारखंच घडलं, पत्नीचं टीममधल्या खेळाडूसोबत अफेयर!
Next Article
advertisement
Gold Price Prediction : आताच सोनं खरेदी करावं की पुढील वर्षाची वाट पाहावी? एक्सपर्टची मोठी भविष्यवाणी
आताच सोनं खरेदी करावं की पुढील वर्षाची वाट पाहावी? एक्सपर्टची मोठी भविष्यवाणी
  • आताच सोनं खरेदी करावं की पुढील वर्षाची वाट पाहावी? एक्सपर्टची मोठी भविष्यवाणी

  • आताच सोनं खरेदी करावं की पुढील वर्षाची वाट पाहावी? एक्सपर्टची मोठी भविष्यवाणी

  • आताच सोनं खरेदी करावं की पुढील वर्षाची वाट पाहावी? एक्सपर्टची मोठी भविष्यवाणी

View All
advertisement