VIDEO : नाद करतो काय! पाकिस्तानी खेळाडू अंगावर धावून गेला, MI च्या कॅप्टनने दोनच मिनिटात उतरवला माज; फायनलमध्ये मोठा राडा

Last Updated:

International League T20 Final : एमआय एमिरेट्सचा कॅप्टन किरॉन पोलार्ड आणि पाकिस्तानचा बॉलर नसीम शहा यांच्यात मोठा राडा (Naseem Shah Kieron Pollard Fight) झाल्याचं पहायला मिळालं. अखेर अंपायरने वाद मिटवला.

Naseem Shah Kieron Pollard Fight DP World ILT20 Final
Naseem Shah Kieron Pollard Fight DP World ILT20 Final
Naseem Shah Kieron Pollard Fight : इंटरनॅशनल लीग टी20 (ILT20) च्या चौथ्या सीजनचा फायनल मॅच डेझर्ट वायपर्स आणि एमआय एमिरेट्स यांच्यात अत्यंत अटीतटीचा झाला. या हाय-व्होल्टेज मॅचमध्ये मैदानावर दोन खेळाडूंमध्ये निर्माण झालेला तणावही चाहत्यांच्या चर्चेचा विषय ठरला आहे. वेस्ट इंडिजचा माजी दिग्गज ऑलराउंडर आणि एमआय एमिरेट्सचा कॅप्टन किरॉन पोलार्ड आपल्या आक्रमक स्वभावासाठी ओळखला जातो. या महत्त्वाच्या मॅचमध्ये जेव्हा पाकिस्तानच्या एका बॉलर्सनी त्याला डिवचण्याचा प्रयत्न केला, तेव्हा पोलार्डचा पारा चढला आणि मैदानात राडा पाहायला मिळाला.

नसीम शाहला कडक शब्दांत वॉर्निंग  

डेझर्ट वायपर्सचा वेगवान बॉलर नसीम शाह याने आपल्या बॉलिंगने पोलार्डला अडचणीत आणले होते. पोलार्डला धावा काढण्यासाठी संघर्ष करावा लागत असताना नसीम शाह वारंवार त्याच्यासमोर जाऊन काहीतरी बोलत होता आणि स्वतःच्या बॉलिंगवर कमालीचा गडबडलेला दिसत होता. मैदानावर कोणाचेही वर्चस्व सहन न करणाऱ्या पोलार्डला हे आवडलं नाही आणि त्याने नसीम शाहला कडक शब्दांत वॉर्निंग दिली. पोलार्डने डोळे वटारून बघताच पाकिस्तानी बॉलरची काहीशी घाबरगुंडी उडाली, मात्र तो देखील पोलार्डला भिडायला पुढं गेला होता. अखेर अंपायरने मध्यस्थी करत पोलार्डला शांत केलं आणि त्यानंतरच पुढचा खेळ सुरू झाला.
advertisement

पाहा Video

advertisement

एमआयची टीम 136 रन्सवरच ऑल आऊट

या वादाव्यतिरिक्त नसीम शाहने आपल्या कामगिरीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. फायनलसारख्या दडपणाच्या मॅचमध्ये त्याने 4 ओव्हरमध्ये केवळ 18 रन्स देत 3 महत्त्वाचे विकेट्स आपल्या नावावर केले. विशेष म्हणजे त्याने कीरॉन पोलार्डचाही विकेट घेतला, जो 28 बॉल्समध्ये 28 रन्स काढून बाद झाला. डेझर्ट वायपर्सने प्रथम बॅटिंग करताना कॅप्टन सॅम करन याच्या नाबाद 74 रन्सच्या जोरावर 20 ओव्हरमध्ये 4 बाद 182 रन्सचा डोंगर उभा केला होता. या आव्हानाचा पाठलाग करताना एमआय एमिरेट्सची टीम 18.3 ओव्हरमध्ये 136 रन्सवरच ऑल आऊट झाली.
advertisement

एमआय एमिरेट्सचा पराभव

या विजयासह डेझर्ट वायपर्सने फायनलमध्ये 46 रन्सने विजय मिळवत चॅम्पियन होण्याचा मान पटकावला. नसीम शाहच्या प्रभावी बॉलिंगने एमआय एमिरेट्सच्या बॅटिंग लाईनअपचे कंबरडे मोडले. सॅम करनने 51 बॉल्समध्ये खेळलेली कॅप्टन इनिंग या विजयात निर्णायक ठरली. एमआय एमिरेट्सचा पराभव झाला असला तरी, पोलार्ड आणि नसीम शाह यांच्यातील तो राडा सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. या सिरीजच्या विजयामुळे डेझर्ट वायपर्सच्या गोटात सध्या आनंदाचे वातावरण आहे.
view comments
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
VIDEO : नाद करतो काय! पाकिस्तानी खेळाडू अंगावर धावून गेला, MI च्या कॅप्टनने दोनच मिनिटात उतरवला माज; फायनलमध्ये मोठा राडा
Next Article
advertisement
US Attack Venezuela Gold Price: अमेरिकेचा व्हेनेझुएलावर हल्ला, सोनं-चांदीच्या दराचं काय होणार? एक्सपर्टच्या अंदाजाने गुंतवणूकदारांची झोप उडणार!
अमेरिकेचा व्हेनेझुएलावर हल्ला, सोनं-चांदीच्या दराचं काय होणार? एक्सपर्टच्या अंदा
  • अमेरिकेने व्हेनेझुएला देशावर हल्ला करत राष्ट्रपती मादुरो यांना अटक केली.

  • व्हेनेझुएला हा देश सर्वाधिक तेल उत्पादन करणाऱ्या देशांपैकी एक

  • अमेरिकेच्या हल्ल्याचे परिणाम बाजारावरही होणार असल्याचे संकेत

View All
advertisement