Kalyan : रेल्वे कर्मचाऱ्याचा मृत्यू! ग्रॅच्युईटीच्या पैशांसाठी सासूनेच रचला भयंकर कट; मित्राच्या मदतीने सुनेला रक्ताच्या थारोळ्यात पाडले

Last Updated:

Kalyan Shocking Cirme : कल्याणमध्ये घडलेल्या एका गुन्हेगारीच्या घटनेने सर्व महाराष्ट्र हादरुन गेला आहे. जिथे मुलाच्या पैशासाठी सासूने मित्राच्या मदतीने सुनेला संपवल आहे.

News18
News18
कल्याण : कल्याण पूर्व परिसरात ग्रॅच्युईटीच्या पैशांवरून सासूनेच सुनेचा खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. भारतीय रेल्वेमध्ये कार्यरत असलेल्या विलास गांगुर्डे यांचे दोन महिन्यांपूर्वी निधन झाले होते. त्यांच्या मृत्यूनंतर पत्नी रूपाली विलास गांगुर्डे (वय 35) हिला सुमारे 10 लाख रुपयांची ग्रॅच्युईटीची रक्कम मिळाली होती. या रकमेतून काही हिस्सा देण्यास सासू लताबाई गांगुर्डे हिने मागणी केली होती. मात्र रूपालीने त्यास नकार दिल्याने दोघांमध्ये सतत वाद सुरू होते.
ग्रॅच्युईटीचा वाद रक्तरंजित ठरला
याच वादातून लताबाईने आपल्या मित्राच्या मदतीने सुनेचा काटा काढण्याचा कट रचल्याचे तपासात समोर आले आहे. गुरुवारी रात्री साडेनऊच्या सुमारास कल्याण पूर्वेतील जिम्मीबाग, कर्पेवाडी परिसरातील घरात रूपाली असताना लताबाई गांगुर्डे आणि तिचा मित्र जगदीश म्हात्रे यांनी तिच्या डोक्यात लोखंडी सळईने जोरदार वार केला. या हल्ल्यात रूपालीचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने मध्यरात्रीच्या सुमारास मृतदेह वालधुनी रेल्वे पुलाखाली फेकून देण्यात आला.
advertisement
त्यानंतर वालधुनी रेल्वे पुलाखाली एका महिलेचा मृतदेह बेवारस अवस्थेत आढळून आल्याची माहिती रेल्वे सुरक्षा दलाने महात्मा फुले चौक पोलिसांना दिली. पोलिसांनी तत्काळ तपास सुरू केला. याच वेळी आरोपी सासू लताबाई गांगुर्डे पोलिस ठाण्यात सून बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल करण्यासाठी आली होती. तिने दिलेला फोटो मृत महिलेच्या चेहऱ्याशी जुळत असल्याने पोलिसांचा संशय बळावला.
advertisement
पोलिसांनी कसून चौकशी केल्यानंतर संपूर्ण प्रकार उघडकीस आला. विलास गांगुर्डे यांच्या मृत्यूनंतर अनुकंपा तत्त्वावरील नोकरीवरूनही सासू-सुनेत वाद होता. अखेर पैशांच्या आणि नोकरीच्या वादातून हा खून झाल्याचे निष्पन्न झाले. पोलिस निरीक्षक विजय नाईक यांच्या फिर्यादीवरून लताबाई गांगुर्डे आणि जगदीश म्हात्रे यांच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करून अवघ्या 24 तासांत दोघांना अटक करण्यात आली आहे.
view comments
मराठी बातम्या/Kalyan Dombivli/
Kalyan : रेल्वे कर्मचाऱ्याचा मृत्यू! ग्रॅच्युईटीच्या पैशांसाठी सासूनेच रचला भयंकर कट; मित्राच्या मदतीने सुनेला रक्ताच्या थारोळ्यात पाडले
Next Article
advertisement
US Attack Venezuela Gold Price: अमेरिकेचा व्हेनेझुएलावर हल्ला, सोनं-चांदीच्या दराचं काय होणार? एक्सपर्टच्या अंदाजाने गुंतवणूकदारांची झोप उडणार!
अमेरिकेचा व्हेनेझुएलावर हल्ला, सोनं-चांदीच्या दराचं काय होणार? एक्सपर्टच्या अंदा
  • अमेरिकेने व्हेनेझुएला देशावर हल्ला करत राष्ट्रपती मादुरो यांना अटक केली.

  • व्हेनेझुएला हा देश सर्वाधिक तेल उत्पादन करणाऱ्या देशांपैकी एक

  • अमेरिकेच्या हल्ल्याचे परिणाम बाजारावरही होणार असल्याचे संकेत

View All
advertisement