VIDEO : लिंबूटिंबू नेपाळने बलाढ्य वेस्ट इंडिजला लोळवलं! टी-ट्वेंटीमध्ये मोठा उलटफेर, अखेरच्या ओव्हरमध्ये थ्रिलर ड्रामा
- Published by:Saurabh Talekar
Last Updated:
Nepal beat West Indies In 1st T20I : अखेरच्या ओव्हरमध्ये वेस्ट इंडिजला 28 धावांची गरज होती. नेपाळचा बॉलर डिपेन्दर सिंग याने अखेरच्या ओव्हरमध्ये वेस्ट इंडिजचे हात गुंडाळले.
West Indies vs Nepal, 1st T20I : क्रिकेटच्या मैदानात मोठे उलटफेर नेहमीच पाहायला मिळतात. शारजाहमध्ये देखील नेपाळच्या संघाने ऐतिहासिक कामगिरी करून दाखवली आहे. दोन वेळच्या T-20 वर्ल्ड कप विजेत्या वेस्ट इंडिज संघाला नेपाळने पहिल्या T-20 मॅचमध्ये 19 धावांनी पराभूत करून क्रिकेट जगताला मोठा धक्का दिला. पूर्ण सदस्य असलेल्या संघाविरुद्ध नेपाळचा हा पहिलाच विजय असून, नेपाळ सध्या पूर्ण सदस्य संघाविरुद्ध पहिली द्विपक्षीय सीरीज खेळत आहे. या विजयासह नेपाळने तीन T-20 मॅचच्या सीरीजमध्ये 1-0 अशी आघाडी घेतली आहे.
वेस्ट इंडिजचे हात गुंडाळले
अखेरच्या ओव्हरमध्ये वेस्ट इंडिजला 28 धावांची गरज होती. नेपाळचा बॉलर डिपेन्दर सिंग याने अखेरच्या ओव्हरमध्ये वेस्ट इंडिजचे हात गुंडाळले. दुसऱ्या आणि तिसर्या बॉलवर फोर गेल्याने वेस्ट इंडिजच्या आशा उज्वलित झाल्या होत्या. त्यानंतर अखेरच्या तीन बॉलवर एकही रन न दिल्याने नेपाळला सहज विजय मिळवता आला आहे.
advertisement
THE HISTORIC MOMENT
- NEPAL WON A MATCH AGAINST THE FULL MEMBER NATION FOR THE FIRST TIME EVER...!!!
The Rising team in International cricket. pic.twitter.com/4EjGZy1Ut9
— Johns. (@CricCrazyJohns) September 27, 2025
कसा रंगला सामना?
advertisement
नेपाळने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित २० ओव्हर्समध्ये ८ विकेट्स गमावून १४८ धावांचा सन्मानजनक स्कोर उभा केला. १२ धावांवर २ विकेट्स गमावल्यानंतर कर्णधार रोहित पौडेल (३८ धावा) आणि कुसल मल्ला (२० धावा) यांनी डाव सावरला. शेवटी गुलशन झा (२२) आणि दीपेंद्र सिंह (१७) यांच्या उपयुक्त योगदानाने संघाला १४८ पर्यंत मजल मारता आली. ४९ धावांचा पाठलाग करताना वेस्ट इंडिजचा अनुभवहीन संघ २० ओव्हर्समध्ये ९ विकेट्स गमावून केवळ १२९ धावाच करू शकला. नवीन बिदाईसी (२२ धावा) वगळता वेस्ट इंडिजचा एकही फलंदाज मोठी खेळी करू शकला नाही.
advertisement
पुरस्कार देशातील शहीदांना समर्पित
दरम्यान, नेपाळच्या या विजयाचा नायक कर्णधार रोहित पौडेल होता, ज्याने ३८ धावांची शानदार खेळी केली. त्याला या डावासाठी सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला. भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादवप्रमाणेच रोहितनेही हा पुरस्कार आपल्या देशातील शहीदांना समर्पित केला. मी हा पुरस्कार आपल्या देशातील निषेधांमध्ये भाग घेतलेल्या शहीदांना समर्पित करू इच्छितो. गेल्या महिन्यातील काळ आमच्यासाठी चांगला गेला नाही, म्हणून जर आपण नेपाळच्या लोकांना थोडा आनंद देऊ शकलो तर ते खूप चांगले होईल असे मला वाटतं, असं रोहितने देखील म्हटलं आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
September 28, 2025 11:33 AM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
VIDEO : लिंबूटिंबू नेपाळने बलाढ्य वेस्ट इंडिजला लोळवलं! टी-ट्वेंटीमध्ये मोठा उलटफेर, अखेरच्या ओव्हरमध्ये थ्रिलर ड्रामा