Thane News: मुलगा म्हणावं की हैवान! मारहाण करून वृद्ध मायबापाला केलं बेघर, ठाण्यातील संतापजनक घटना

Last Updated:

Thane News: एका मुलाने आपल्या आई-वडिलांना मारहाण करून घरातून हाकलून दिलं आहे.

Thane News: मुलगा म्हणावं की हैवान! मारहाण करून वृद्ध मायबापाला केलं बेघर, ठाण्यातील संतापजनक घटना
Thane News: मुलगा म्हणावं की हैवान! मारहाण करून वृद्ध मायबापाला केलं बेघर, ठाण्यातील संतापजनक घटना
ठाणे: प्रत्येक आई-वडील आपल्या लेकराला तळहाताच्या फोडाप्रमाणे जपतात. त्याला लहानचं मोठं करण्यासाठी, शिक्षण आणि इतर सुविधा देण्यासाठी मायबाप जीवाचं रान करतात. या बदल्यात मुलांनी वृद्धपकाळात आपला सांभाळ करावा, इतकीच माफक अपेक्षा त्यांची असते. मात्र, काही मुलं मायबापाचे उपकार क्षणात विसरतात. प्रसंगी त्यांना घराबाहेर देखील काढतात. ठाण्यातील मानपाडा परिसरामध्ये अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका मुलाने आपल्या आई-वडिलांना मारहाण करून घरातून हाकलून दिलं आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, एक 74 वर्षीय सेवानिवृत्त व्यक्ती आपली 65 वर्षांची पत्नी आणि 40 वर्षांच्या दिव्यांग मुलासोबत मानपाडा येथे राहतात. त्यांचा मोठा मुलगा त्याच्या कुटुंबासमवेत टिटवाळा येथे राहत होता. एप्रिल 2025मध्ये तो पत्नीसह वाघबीळ येथे राहण्यास आला. त्याचे आणि त्याची पत्नीचे सतत वाद होत होते. त्याच्या त्रासाला कंटाळून त्याची पत्नी जुलै 2025मध्ये त्याला सोडून माहेरी निघून गेली.
advertisement
त्यानंतर हा मुलगा वडिलांच्या मालकीच्या मानपाडा येथील घरात राहण्यासाठी आला होता. घरात राहण्यासाठी आल्यानंतर त्याने अरेरावी करण्यास सुरुवात केली. तुम्ही घरामध्ये राहायचे नाही, मला हे घर विकायचं आहे त्यामुळे तुम्ही घराच्या बाहेर निघा, असं म्हणून तो आई-वडिलांना शिवीगाळ करत असे. तसेच तुमच्यामुळे माझी बायको माहेरी गेली, असं बोलून तो आई-वडिलांना मारहाण देखील करत होता.
advertisement
एक दिवस गावी असलेली जमीन आणि वडिलांच्या नावे असलेलं घर विकण्यासाठी त्याने आई-वडिलांना मारहाण करत घरातून बाहेर काढलं. पोटच्या मुलाच्या त्रासाला कंटाळून वडिलांनी मुलाविरोधात कापूरबावडी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे.
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Thane News: मुलगा म्हणावं की हैवान! मारहाण करून वृद्ध मायबापाला केलं बेघर, ठाण्यातील संतापजनक घटना
Next Article
advertisement
Guess Who: 15 व्या वर्षी घरातून पळाली, नशेच्या आहारी गेली; आज कोट्यवधींची मालकीण आहे ही अभिनेत्री
15व्या वर्षी घरातून पळाली, नशेच्या आहारी गेली; आज अभिनेत्री कोट्यवधींची मालकीण
    View All
    advertisement