Asia Cup Final : हँडशेकनंतर आता 'नो फोटोशूट', पाकिस्तानच्या नाकाला झोंबल्या मिर्च्या, कॅप्टन सलमान आगा म्हणाला ‘सूर्याला जर...’

Last Updated:

Salman Ali Agha Angry On No Photoshoot : आम्ही आमच्या मर्यादेत उत्तर देऊ, असं सलमान अली आगा याने म्हणल्यानंतर त्याला फोटोशूटच्या प्रकरणावर प्रश्न विचारला गेला.

Salman Ali Agha Angry On No Photoshoot
Salman Ali Agha Angry On No Photoshoot
Salman Ali Agha Statement : दुबईच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर भारत विरुद्ध पाकिस्तान असा हायव्होल्टेज सामना रंगणार आहे. हा सामना रात्री आठ वाजता सुरू होणार आहे. अशातच सामन्याआधी टीम इंडियाचा कॅप्टन सूर्यकमार यादव याने मोठा निर्णय घेतला अन् पाकिस्तानला पुन्हा गुडघ्यावर आणलं. पाकिस्तानसोबत नो हँडशेकचा नारा दिल्यानंतर आता नो फोटोशूट असं देखील सूर्याने म्हटलं आहे. सूर्यकुमारने पाकिस्तानसोबत फोटोशूट न करण्याचा निर्णय घेतला आहे.

सलमान अली आगा चांगलाच संतापला

सूर्यकुमारच्या या निर्णयामुळे पाकिस्तानचा कॅप्टन सलमान अली आगा चांगलाच संतापल्याचं पहायला मिळालं. मी कधीही कोणत्याही संघाला हस्तांदोलन करण्यापासून परावृत्त होताना पाहिलं नाही. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संबंध ताणले गेले असतानाही आम्ही हस्तांदोलन केलं. आमच्या संघाला अंतिम सामन्यात मोकळीक असेल, परंतु आम्ही आमच्या मर्यादेत उत्तर देऊ, असं सलमान अली आगा याने म्हटलं आहे. त्यावेळी सलमान आगा याला फोटोशूटच्या प्रकरणावर प्रश्न विचारला गेला.
advertisement

मी काहीच करू शकत नाही - सलमान आगा

फोटोशूटला यायचं की नाही, हा संपूर्ण निर्णय सूर्यकुमार यादवचा आहे. त्याचा यायचं असेल तर येईल नाहीतर नाही. मी त्यात काहीही करू शकत नाही, असं म्हणत सलमान अली आगा याने हतबलता दाखवली. त्यावेळी सलमान अली आगा काहीसा संतापल्याचं देखील दिसून आलं.
advertisement

आम्ही खूप चुका केल्या पण... - सलमान अली आगा

दरम्यान, भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यात नेहमीच दबाव असतो. आम्ही शेवटचे दोन सामने गमावले कारण आम्ही खूप चुका केल्या. फायनलमध्ये दोन्ही संघांना सारख्याच दबावाचा सामना करावा लागेल. होय, मी आशिया कपमध्ये चांगली कामगिरी केलेली नाही आणि माझा स्ट्राइक रेट अपेक्षेनुसार नाही. 150 च्या स्ट्राइक रेटने फलंदाजी करणं आवश्यक नाही. परिस्थितीनुसार खेळणे महत्त्वाचे आहे, असं म्हणत सलमानने आपली चूक देखील कबूल केली आहे.
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
Asia Cup Final : हँडशेकनंतर आता 'नो फोटोशूट', पाकिस्तानच्या नाकाला झोंबल्या मिर्च्या, कॅप्टन सलमान आगा म्हणाला ‘सूर्याला जर...’
Next Article
advertisement
Guess Who: 15 व्या वर्षी घरातून पळाली, नशेच्या आहारी गेली; आज कोट्यवधींची मालकीण आहे ही अभिनेत्री
15व्या वर्षी घरातून पळाली, नशेच्या आहारी गेली; आज अभिनेत्री कोट्यवधींची मालकीण
    View All
    advertisement