WI vs NEP : नेपाळने घडवला चमत्कार, बलाढ्य वेस्ट इंडिजचा पराभव करत इतिहास रचला! पठ्ठ्यांनी सिरीज जिंकली
- Published by:Saurabh Talekar
Last Updated:
West Indies vs Nepal : प्रथम फलंदाजी करताना नेपाळने 20 ओव्हरमध्ये 6 बाद 173 धावा केल्या आणि नंतर विंडीजला 17.1 ओव्हरमध्ये 83 धावांवर गुंडाळलं.
Nepal vs West Indies : एकीकडे देशात राजकीय कलह निर्माण झाला असताना दुसरीकडे नेपाळच्या टीमने क्रिकेटच्या मैदानात मोठा पराक्रम गाजवला आहे. लिंबूटिंबू वाटणाऱ्या नेपाळच्या टीमने बलाढ्य वेस्ट इंडिज संघाचा पराभव करत मालिका खिशात घातली. नेपाळच्या टीमने सलग दुसऱ्यांदा वेस्ट इंडिजचा पराभव केलाय. नेपाळने केवळ त्यांचा दुसरा सामना जिंकला नाही तर तीन सामन्यांच्या टी-ट्वेंटी मालिकेत 2-0 अशी अजिंक्य आघाडी घेतली.
17.1 ओव्हरमध्ये 83 धावांवर गुंडाळलं
सोमवारी शारजाह येथे झालेल्या दुसऱ्या टी-ट्वेंटी सामन्यात त्यांनी वेस्ट इंडिजचा 90 धावांच्या मोठ्या फरकाने पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना नेपाळने 20 ओव्हरमध्ये 6 बाद 173 धावा केल्या आणि नंतर विंडीजला 17.1 ओव्हरमध्ये 83 धावांवर गुंडाळले. आयसीसी पूर्ण सदस्य असलेल्या कसोटी राष्ट्राविरुद्ध नेपाळचा हा पहिलाच टी-ट्वेंटी मालिका विजय आहे. आसिफ शेख नेपाळच्या विजयाचा हिरो ठरला. त्याने 68 धावांची खेळी केली.
advertisement
जेसन होल्डरच्या 21 धावा
नेपाळसाठी संदीप जोरा याने देखील अफलातून कामगिरी केली अन् 63 धावांचं योगदान दिलं. तर मोहम्मद आदिल आलम याने चार विकेट्स घेतल्या अन् नेपाळला मोठी आघाडी मिळवून दिली होती. तर वेस्ट इंडिज खेळाडूंना नावाला साजेशी कामगिरी करता आली नाही. जेसन होल्डरने संघासाठी सर्वाधिक 21 धावा केल्या. अकीम ऑगस्टेने 17 धावांची खेळी केली. आमिर जांगूला फक्त 16 धावा करता आल्या. वेस्ट इंडिजचे हे तीनच फलंदाज आहेत ज्यांनी दुहेरी आकडा गाठला.
advertisement
Winning moment for Team Nepal!
A series victory for the ages — Team Nepal creates history with their first-ever Series victory against Test-playing nation! pic.twitter.com/mzI2vAle4A
— ICC Asia Cricket (@ICCAsiaCricket) September 29, 2025
वेस्ट इंडिज क्रिकेटसाठी खरी कसोटी
advertisement
दरम्यान, नेपाळने तीन सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी निर्णायक आघाडी घेतली असल्याने आता वेस्ट इंडिज संघाची नाचक्की झाल्याचं पहायला मिळतंय. वेस्ट इंडिजला आपली प्रतिमा कायम राखता आली नाही. त्यामुळे भारताविरुद्ध असणारी कसोटी मालिका खऱ्या अर्थाने वेस्ट इंडिज क्रिकेटसाठी खरी कसोटी असणार आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
September 30, 2025 7:38 AM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
WI vs NEP : नेपाळने घडवला चमत्कार, बलाढ्य वेस्ट इंडिजचा पराभव करत इतिहास रचला! पठ्ठ्यांनी सिरीज जिंकली