Asia Cup : सूर्यकुमार यादववर कारवाई... 2 अटी मान्य करा, आता थेट ब्लॅकमेलिंगवर उतरलं पाकिस्तान!

Last Updated:

आशिया कपमध्ये पाकिस्तान आता ब्लॅकमेलिंगवर उतरलं आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने आता सूर्यकुमार यादव याच्यावर कारवाईच्या मागणीसह दोन अटी ठेवल्या आहेत.

सूर्यकुमार यादववर कारवाई... 2 अटी मान्य करा, आता थेट ब्लॅकमेलिंगवर उतरलं पाकिस्तान!
सूर्यकुमार यादववर कारवाई... 2 अटी मान्य करा, आता थेट ब्लॅकमेलिंगवर उतरलं पाकिस्तान!
दुबई : आशिया कपमध्ये पाकिस्तान आता ब्लॅकमेलिंगवर उतरलं आहे. पाकिस्तान आज ग्रुप स्टेजमध्ये युएईविरुद्ध त्यांचा शेवटचा सामना खेळत आहे, पण मॅच सुरू व्हायला काही वेळ शिल्लक असतानाही पाकिस्तानी खेळाडू हॉटेलमध्येच होते, त्यामुळे मॅचवर संकट ओढावलं होतं. अखेर पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने खेळाडूंना स्टेडियममध्ये जायचे आदेश दिले, त्यामुळे ही मॅच उशिरा सुरू होणार आहे.

पाकिस्तानने ठेवल्या 2 अटी

पाकिस्तानमधल्या माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार पीसीबीने युएईविरुद्धच्या मॅचआधी दोन अटी ठेवल्या. या अटी पूर्ण झाल्या तरच मॅच खेळू, अशी धमकी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने दिली होती. यातली एक मागणी मॅच रेफरी ऍन्डी पायक्रॉफ्ट यांना हटवून रिची रिचर्डसन यांची नियुक्ती करण्याची होती. तर दुसरी मागणी टीम इंडियाचा कर्णधार सूर्यकुमार यादव याच्यावर दंडात्मक कारवाई करण्याची होती.
advertisement
टीम इंडियाचा कर्णधार सूर्यकुमार यादव याने क्रिकेट मॅचवेळी राजकीय वक्तव्य केलं, ज्यामुळे खेळ भावना दुखावली गेली आहे, तसंच सूर्यकुमार यादवचं वक्तव्य हे आचारसंहितेचा भंग आहे, असा आरोपही पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने केला आहे.

...तर पाकिस्तानचं 140 कोटींचं नुकसान

पाकिस्तानच्या टीमने जर आशिया कपमधून माघार घेतली असती, तर त्यांचं 12 ते 16 मिलियन अमेरिकन डॉलरचं नुकसान झालं असतं, म्हणजेच त्यांना जवळपास 130 ते 140 कोटी रुपये गमवावे लागले असते.
advertisement

मॅच रेफरीवर पाकिस्तानचा आक्षेप

भारत-पाकिस्तान सामन्यात टीम इंडियाच्या खेळाडूंनी पाकिस्तानी खेळाडूंसोबत हस्तांदोलन केलं नाही. टॉसच्या आधी मॅच रेफरी ऍन्डी पायक्रॉफ्ट यांनी पाकिस्तानी कर्णधार सलमान आघा याला हस्तांदोलन होणार नसल्याचं सांगितलं. मॅच रेफरीच्या या वर्तनावरून पाकिस्तान क्रिकेट बोर्ड नाराज झालं. मॅच रेफरीने आयसीसीच्या नियमांचं उल्लंघन केलं असून त्यांनी एका टीमची बाजू घेतली, असा दावा पीसीबीने केला. तसंच युएईविरुद्धच्या सामन्यातून ऍन्डी पायक्रॉफ्ट यांना हटवण्याची मागणीही पाकिस्तानने केली. आयसीसीने मात्र पाकिस्तान क्रिकेट बोर्डाची मागणी मान्य केली नाही.
advertisement
ऍन्डी पायक्रॉफ्ट यांना हटवलं नाही तर युएईविरुद्धचा सामना खेळणार नाही, अशी धमकीही पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने दिली होती. याचाच भाग म्हणून पाकिस्तानी खेळाडू युएईविरुद्धच्या सामन्यासाठी हॉटेलमधून बराच वेळ निघाले नव्हते. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या बैठकीनंतर खेळाडू स्टेडियममध्ये जाण्यासाठी निघाले. दुबईमध्ये झालेल्या या राड्यामुळे सामना जवळपास एक तास उशिराने सुरू होण्याची शक्यता आहे.
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
Asia Cup : सूर्यकुमार यादववर कारवाई... 2 अटी मान्य करा, आता थेट ब्लॅकमेलिंगवर उतरलं पाकिस्तान!
Next Article
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement