MobiKwik Fraud : 40 कोटींची मोठी फसवणूक! खाते रिकामं असतानाही पूर्ण झालं पेमेंट; मोबिक्विक अॅपचा मोठा घोटाळा उघड
- Published by:Devika Shinde
Last Updated:
अशाच एका धक्कादायक प्रकरणात मोबिक्विक अॅपमध्ये आलेल्या तांत्रिक बगचा फायदा घेत जवळपास 40 कोटी रुपयांची मोठी फसवणूक करण्यात आली. या प्रकरणानंतर फिनटेक प्लॅटफॉर्म्सची सुरक्षा आणि त्यांचं नियमन यावर गंभीर प्रश्न निर्माण झालं आहेत.
मुंबई : आजच्या डिजिटल पेमेंटच्या युगात मोबाईल अॅप्स आणि फिनटेक प्लॅटफॉर्म्समुळे व्यवहार करणे अत्यंत सोपे झाले आहे. पण जिथे सुविधा असते, तिथे धोका ही लपलेला असतो. छोट्या-छोट्या तांत्रिक त्रुटींचा गैरफायदा घेत लाखो रुपयांचे घोटाळे होऊ शकतात. त्यामुळे वापरकर्त्यांनी स्ट्राँग पासवर्ड, नियमित व्यवहारांची तपासणी आणि संशयास्पद लिंकपासून दूर राहणं हे अत्यावश्यक आहे.
अशाच एका धक्कादायक प्रकरणात मोबिक्विक अॅपमध्ये आलेल्या तांत्रिक बगचा फायदा घेत जवळपास 40 कोटी रुपयांची मोठी फसवणूक करण्यात आली. या प्रकरणानंतर फिनटेक प्लॅटफॉर्म्सची सुरक्षा आणि त्यांचं नियमन यावर गंभीर प्रश्न निर्माण झालं आहेत.
गुरुग्राम पोलिसांच्या माहितीनुसार, मोबिक्विक अॅपमधील बगमुळे ग्राहकांकडे पुरेसा बॅलन्स नसतानाही किंवा चुकीचा पासवर्ड टाकल्यानंतरही व्यवहार ‘यशस्वी’ नोंदवले जात होते. या त्रुटीचा फायदा घेत आरोपींनी आपल्या बँक खात्यांमध्ये कोट्यवधी रुपये ट्रान्सफर केले.
advertisement
या प्रकरणी पोलिसांनी सहा जणांना अटक केली असून, त्यांच्या जवळपास 2,500 बँक खाती फ्रीज करण्यात आली आहेत. आतापर्यंत जवळपास 8 कोटी रुपये परत मिळवण्यात यश आलं आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे रेहान, मोहम्मद शकील, वकार यूनिस, वसीम अकरम, मोहम्मद आमिर आणि मोहम्मद अंसार अशी आहेत.
मोबिक्विक घोटाळा हा पहिलाच प्रकार नाही. यापूर्वी ऑगस्ट महिन्यात पॉलिसीबाजार इन्शुरन्स ब्रोकर्स कंपनीच्या नावाने बनावट कागदपत्रं तयार करून ग्राहकांना फसवल्याची घटना समोर आली होती. त्या प्रकरणात 11 ग्राहकांची एकूण 2.08 लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली होती.
advertisement
तज्ज्ञांच्या मते, फिनटेक प्लॅटफॉर्म्सवर वारंवार होणाऱ्या अशा तांत्रिक त्रुटी आणि फसवणूक प्रकरणांमुळे ग्राहकांचा विश्वास कमी होऊ शकतो. त्यामुळे अशा अनियमिततेची चौकशी नियामक संस्था, तसेच ईडी आणि सीबीआयसारख्या सरकारी एजन्सींनी काटेकोरपणे करणं गरजेचं आहे.
सध्या पोलिसांनी भारतीय दंड संहिता (IPC) अंतर्गत फसवणुकीसंदर्भातील कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे. तपास अजून सुरू असून, या प्रकरणात आणखी लोकांचा सहभाग असू शकतो, असं पोलिसांनी सांगितलं. कंपनीनेही पूर्ण नुकसान भरून काढण्यासाठी कायदेशीर पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
September 17, 2025 8:08 PM IST
मराठी बातम्या/टेक्नोलॉजी/
MobiKwik Fraud : 40 कोटींची मोठी फसवणूक! खाते रिकामं असतानाही पूर्ण झालं पेमेंट; मोबिक्विक अॅपचा मोठा घोटाळा उघड