राजस्थान रॉयल्सची संकट संपेना! संजू-द्रविड वादानंतर आता आणखी एक भानगड सुप्रीम कोर्टात
- Published by:Shreyas Deshpande
Last Updated:
आयपीएल 2025 च्या मोसमात नवव्या क्रमांकावर राहिलेल्या राजस्थान रॉयल्ससमोरची संकटं काही कमी व्हायचं नाव घेत नाहीयेत.
मुंबई : आयपीएल 2025 च्या मोसमात नवव्या क्रमांकावर राहिलेल्या राजस्थान रॉयल्ससमोरची संकटं काही कमी व्हायचं नाव घेत नाहीयेत. आधीच कर्णधार संजू सॅमसन याने टीमची साथ सोडण्याची इच्छा व्यक्त केली आहे, तर राहुल द्रविडने टीमच्या मुख्य प्रशिक्षकपदाचा राजीनामाही दिला आहे, यानंतर आता राजस्थान रॉयल्सचं आणखी एक प्रकरण सुप्रीम कोर्टात पोहोचलं आहे. खेळाडूच्या इन्श्युरन्सबाबत राष्ट्रीय उपभोक्ता विवाद निवारण आयोग (NCDRC) यांच्या निर्णयाविरोधात विमा कंपनी सुप्रीम कोर्टात पोहोचली आहे.
2012 च्या आयपीएल मोसमात एस.श्रीसंत याला दुखापत झाली होती, त्यामुळे त्याच्या दुखापतीचे 82 लाख रुपये विमा कंपनीने राजस्थान रॉयल्सना द्यावेत, असे आदेश NCDRC ने दिले होते, त्याविरोधात विमा कंपनीने सुप्रीम कोर्टाचा दरवाजा ठोठावला आहे. 2012 च्या मोसमात श्रीसंत दुखापतीमुळे खेळू शकला नव्हता. श्रीसंतची फिटनेस प्रमाणपत्र तसंच इतर कागदपत्रे सादर करण्यासाठी सुप्रीम कोर्टाने हे प्रकरण पुढे ढकलले आहे.
advertisement
श्रीसंतच्या पायाला झालेली दुखापत ही विमा कालावधीच्या आधीच झाली होती, असा दावा विमा कंपनी युनायटेड इन्श्युरन्सने कोर्टात केला, पण राजस्थान रॉयल्सने हा दावा फेटाळून लावला आणि श्रीसंतला झालेली दुखापत ही विमा कालावधीमध्ये झाली असल्याचं सांगितलं. सराव सत्रावेळी श्रीसंतला दुखापत झाली, असं राजस्थान रॉयल्सच्या वकिलांनी कोर्टात सांगितलं.
का केला जातो खेळाडूंचा विमा?
advertisement
आयपीएलमधल्या टीम खेळाडूंवर कोट्यवधींची गुंतवणूक करतात, पण आयपीएल मोसमादरम्यान खेळाडूंना दुखापत झाली तर टीमचं मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसानही होतं, त्यामुळे आयपीएल फ्रॅन्चायजी या खेळाडूंचा विमा उतरवत असतात.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
September 02, 2025 4:41 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
राजस्थान रॉयल्सची संकट संपेना! संजू-द्रविड वादानंतर आता आणखी एक भानगड सुप्रीम कोर्टात